Monday, July 28, 2025
Homeक्रीडापहिल्या विजयासाठी आज Mumbai Indians च्या टीममध्ये काय बदल होतील?

पहिल्या विजयासाठी आज Mumbai Indians च्या टीममध्ये काय बदल होतील?

यंदाच्या आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स अशा दोन टीम्स आहेत, ज्यांना अजूनपर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. या दोन टीम्सपैकी एकाच मंगळवारी खात उघडणार हे निश्चित आहे. दिल्ली आपल्या घरच्या मैदानात अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळणार आहे. दोन्ही टीम्सचा विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. यंदाच्या सीजनमध्ये दोन्ही टीम्सचा संघर्ष सुरु आहे.
दिल्ली कॅपिटल्सने या सीजनमध्ये पराभवाची हॅट्ट्रिक केलीय. मुंबई इंडियन्सचा पहिला दोन सामन्यात पराभव झालाय. या दोन्ही टीम्सचा एक मुख्य प्रॉब्लेम आहे. या दोन्ही टीम्सना विनिंग कॉम्बिनेशन सापडत नाहीय. आजच्या सामन्यात विनिंग कॉम्बिनेशन शोधण्याचा दोन्ही टीम्सचा प्रयत्न असेल.

मुंबई इंडियन्स बद्दल बोलायच झाल्यास, त्यांच्याकडे मोठी नावं आहेत. चांगले प्रतिभावान खेळाडू आहेत. पण हे दोन्ही प्रकारचे खेळाडू अजूनपर्यंत फेल ठरलेत. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 8 विकेटने, त्यानंतर चेन्नईने मुंबईला आरामात हरवलं. टीमच्या बॅटिंगची धुरा कॅप्टन रोहित शर्मा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादववर टिकून आहे. पण तिघेही फेल ठरलेत.

या तिघांची बॅट कधी तळपणार?

टिम डेविड, कॅमरुन ग्रीन आणि ट्रिस्टन स्ट्ब्सने टीमला निराश केलय. मागच्या सीजनमध्ये तिलक वर्माच्या रुपाने मुंबईला चांगला फलंदाज मिळाला. त्याने RCB विरुद्ध पहिल्या सामन्यात 84 धावा फटकावल्या. मात्र त्याच्याशिवाय अन्य दुसरे फलंदाज प्रभावित करु शकलेले नाहीत. कॅप्टन रोहित शर्माला धावा बनवाव्या लागतील, तर अन्य फलंदाजांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.

मुंबईच्या टीममध्ये काय बदल होतील?

दोन्ही टीममध्ये बदलांबद्दल बोलायच झाल्यास, जोफ्रा आर्चर टीममध्ये आल्यास, जेसन बेहरनडॉर्फला बाहेर बसाव लागेल. अर्शद खानने प्रभावित केलेलं नाही. त्याच्याजागी संदीप वॉरियरला संधी मिळू शकते. मुंबई कुमार कार्तिकेय आणि तिलक वर्मा यांचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर करु शकते.

दिल्लीच्या टीममध्ये काय बदल होतील?

दिल्लीच्या टीममध्ये खलील अहमद पूर्णपणे फिट नाहीय. चेतन साकरिया त्याची जागा घेऊ शकतो. मागच्या मॅचमध्ये दिल्लीने पृथ्वीचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर केला होता. आज सुद्धा दिल्लीची टीम असाच प्रयोग करु शकते. प्रथम फलंदाजी केल्यास मुकेश कुमारचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर होऊ शकतो. मिचेल मार्शच्या जागी फिल सॉल्टला संधी मिळू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -