Saturday, September 7, 2024
Homeराजकीय घडामोडी“एकतर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या किंवा मुख्यमंत्री शिंदेंनी राजीनामा द्यावा”

“एकतर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या किंवा मुख्यमंत्री शिंदेंनी राजीनामा द्यावा”

बाबरी पाडण्यात शिवेसेनेची बाळासाहेब ठाकरेंची भूमिका नव्हती या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीका केली. तसंच एकतर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या किंवा मुख्यमंत्री शिंदेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी उद्ध ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काल गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील ह्या आपल्या बाबरीच्या खंडकातून बाहेर पडले. असे अनेक उंदीर बाहेर पडत आहे. जेव्हा बाबरी पडली तेव्हा हे उंदीर बिळात लपले होते. अगदी त्यावेळी सुद्धा पंतप्रधान हे बांगलादेशच्या सत्याग्रहात सामील होते. पण बाबरीच्या विषयात कुठेही नाव आले नाही. त्यावेळी जाहीर केलं होतं, भाजपचा आणि कुणाचाही हात नव्हता, हे त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि यात शिवसेनेचा हात होता, असं जाहीर केलं होतं.

बाळासाहेबांचा इतका अपमान झाला नाही. आता बाळासाहेबांचे नाव घेऊ नका. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच भाजप हा भारतीय जनता पक्ष नव्हे तर भरकटलेला जनता पक्ष असा आहे. या भरकटलेल्या पक्षासोबत किती दिवस बसणार असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, बातमी ज्यावेळी आली होती, त्यावेळी मी मातोश्रीवर होतो, एक फोन आला होता. पळत जाऊन बाळासाहेबांना सांगितलं होतं, त्यांनी फोन उचलला आणि शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर आम्हाला अभिमान आहे. हे कसलं नंपुसक नेतृत्व आहे, असं नेतृत्व देशाला लाभलं तर या देशात हिंदू कधी उभाच राहू शकणार नाही.

काल बातमी वाचली त्यात मुघलांचा इतिहास पुसला जात आहे. पण आता हा इतिहास पुसता पुसता हिंदूंचा इतिहासही पुसला जाण्याची भीती आहे. ज्यांच्याकडे शौर्य नसतं त्यांना शौर्य करता येत नाही. भाजपकडे शौर्य नाही. मुंबईत दंगल झाली ती शिवसैनिकांनी वाचवली. गुजरातमध्ये दंगल झाली ती वेगळी होती. त्यावेळी पोलीस त्यांच्यासोबत होते असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

राज्यपाल आणि मुख्यमंत्री पद हे मोठे आहे. पण आमचे हे मिंधे बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून त्यांच्यासोबत गेले. त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे नाहीतर स्वत: मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. आता ते कुणाला जोडे मारणार आहे, किंवा त्याच जोड्याने तोंड फोडून घेणार आहात. बाळासाहेबांचा एवढा अपमान केला आहे. तुम्हाला काय चाटायचं ते चाटा पण बाळासाहेबांचं नाव घेऊ नका. हे बाळासाहेबांचे विचार नाही. ज्या मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील बोलत आहे, त्यांनी अडवाणींची मुलाखत पाहावी असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -