तुम्ही मोबाईल वापरता का? हा प्रश्न आता कालबाह्य झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येताच्याच हातात, नव्हे तर नजरेपुढे मोबाईल असतो. स्मार्टफोन असो किंवा एखादा साधा फोन असो, मोबाईलला सध्या आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. अर्थात काही मंडळी अशीही आहेत जी आजही मोबाईल वापरत नाहीत. पण, तीसुद्धा फार कमी. तुमच्या हातात असणाऱ्या लहानशा मोबाईलमध्ये इतक्या साऱ्या गोष्टी दडलेल्या असतात की जाणून तुम्हीही हैराण व्हाल.
फिचर्स, अॅप्स आणि बरंच काही दडलेलं असतं या मोबाईलमध्ये. पण, इतकं सगळं असूनही आसात सरकारनं सांगितलेलं फिचर नसल्यास तुमचा मोबाईल बंद पडणार आहे. सरकारकडूनच यासंबंधीचे निर्देश देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचं वाढलेलं प्रमाण पाहता सरकारकडून मोबाईल कंपन्यांना इमर्जन्सी अलर्ट हे फिचर देणं अनिवार्य केलं आहे. शासनाच्या या आदेशानंतरही जर एखाद्या कंपनीकडून त्यांच्या मोबाईल प्रोडक्टमध्ये हे फिचर देण्यात आलं नाही तर त्या कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. किंबहुना हे फिचर नसणाऱ्या स्मार्टफोन्सची विक्रीच भारतात बंद करण्यात येणार आहे. यासाठी कंपन्यांकडे जवळपास 6 महिन्यांचा वेळ आहे.
येत्या काळात मोबाईल कंपन्यांनी हे फिचर असणाऱ्याच मोबाईलची विक्री करावी असं सांगत जुन्या स्मार्टफोनमध्ये यासंबंधीचं सॉफ्टवेअर अपडेट करत हे फिचर उपलब्ध करून द्यावं अशा सूचनाही केंद्रानं केल्या आहेत.
ब्रेकिंग : मोबाईलसंबंधी सरकारचा मोठा निर्णय!
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -