Friday, February 7, 2025
Homeक्रीडाIPL 2023 : दिल्लीसाठी आव्हान राखणे कठीण; पुढील दहापैकी आठ सामने जिंकणे...

IPL 2023 : दिल्लीसाठी आव्हान राखणे कठीण; पुढील दहापैकी आठ सामने जिंकणे गरजेचे

आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाला यंदाच्याही मोसमात अपयशाचा सामना करावा लागत आहे. त्यांनी सलग चार सामने गमावले असल्याने या स्पर्धेतील त्यांचे आव्हान टिकवण्यासाठी त्यांना चमत्कारच करून दाखवावा लागणार आहे.

त्यांनी जर पुढील 10 पैकी 8 सामने जिंकले तरच त्यांचे आव्हान टिकण्याच्या आशा कायम राहणार आहेत.

यंदाच्या स्पर्धेत प्रत्येक संघ 14 सामने खेळणार असून सध्या चौथ्या फेरीचा टप्पा सुरू आहे. आता दिल्लीचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. त्यामुळे या सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतील आव्हान टिकवणे त्यांच्यासाठी आणखी कठीण बनणार आहे. दिल्लीचा अपवाद वगळला तर अन्य संघांनी आतापर्यंत 4 ते 6 गुणांची कमाई केली आहे.

बंगळुरूने तीन पैकी दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे चौथा सामना जिंकून आव्हान कायम ठेवण्यासाठी त्यांना दिल्ली विरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. दुसरीकडे दिल्लीसाठी हा सामना करो या मरो असाच आहे. हा सामनाही गमावला तर सलग पाच पराभवानंतर स्पर्धेतील आव्हान कायम राखणे त्यांच्यासाठी कठीण होणार आहे. तसेच नेट रनरेटही उणे असल्याने आणखी नुकसान होऊ शकते. या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांत प्रमुख खेळाडूंच्या अपयशाचा तसेच काही खेळाडूंच्या दुखापतींचा दिल्ली संघाला फटका बसला आहे.

दिल्लीला पहिल्या सामन्यात लखनौने 50 धावांनी, दुसऱ्या सामन्यात गुजरातने 6 गडी राखून, तिसऱ्या सामन्यात राजस्थानने 57 धावांनी, तर चौथ्या सामन्यात मुंबईने 6 गडी राखून पराभूत केले आहे. दिल्ली व बंगळुरू या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 27 वेळा समोरासमोर आले असून बंगळुरूने 16 तर दिल्लीने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -