Friday, February 7, 2025
Homeक्रीडामुंबई पलटणचा कोलकाता नाईट रायडर्सवर विजय

मुंबई पलटणचा कोलकाता नाईट रायडर्सवर विजय

रविवावरच्या डबल हेडरमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादव मुंबई संघाचे नेतृत्व करत होता. नियमित कर्णधार रोहित शर्माची तब्येत बिघडल्याने त्याला इम्पॅक्ट खेळाडूंच्या यादीत ठेवले गेल होते. तरी तो सलामीला फलंदाजी करण्यासाठी आला. इशानच्या साथीने आक्रमक सुरुवात करून देत त्याने विजयाचा भक्कम पाया रचला. मुंबई पलटणने कोलकातावर तब्बल पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

कोलकाताने ठेवलेल्या १८६ धावांचा पाठलाग करताना जबरदस्त सुरुवात केली. सलामीवीर इशान किशनने अफलातून अर्धशतक करत मुंबईला विजयाची वाट सोपी करून दिली. तत्पूर्वी, केकेआने नाणेफेक गमावल्यानंतर नितीश राणा याच्या नेतृत्वातील संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. कोलकाताने पावरप्ले दरम्यान नारायन जगदीसन आणि रहमानउल्ला गुरबाज यांच्या विकेट्स गमावल्या. कर्णधार नितीश राणा याने डावातील ९व्या षटकात विकेट गमावली. मुंबईचा युवा फिरकीपटू हृतिक शोकीन या षटकात गोलंदाजीला आला होता. षटकातील पहिलाच चेंडू राणाने षटकारासाठी खेळला. पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला नाही. रामदीप सिंग याच्या हातात तो झेलबाद झाला.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राणाने १० चेंडूत ५ धावा केल्या आणि विकेट गमावली. एकीकडे केकेआर झटपट विकेट्स गमावत असताना दुसरी बाजू वेंकटेश अय्यर याने सांभाळून ठेवली. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक १०४ धावा केल्या. त्याचवेळी, आंद्रे रसेलने ११ चेंडूत नाबाद २१ ट धावा केल्या. मुंबईकडून हृतिक शोकीनने दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी अर्जुन वगळता इतर सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पोट दुखत असल्यामुळे प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर होता. रोहितच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारने नाणेफेक केली आणि जिंकली देखील.

सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन रा तेंडुलकर मागच्या दोन हंगामांपासून मुंबई संघासोबत सराव करत आहे. दीर्घ काळ वाट  पाहिल्यानंतर रविवारी अखेर अर्जुनला पदार्पणाची संधी मिळाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -