आयपीएल 16 व्या सिजनमधील 25 वा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. सनरायजर्स हैदरबादचा कॅप्टन एडन मार्करम याने टॉस जिंकून मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि ईशान किशन ही सलामी जोडी मैदानात आली. रोहित शर्मा याने हैदराबाद विरुद्ध 14 धावा पूर्ण करता मोठा पराक्रम केला आहे. रोहित अशी कामगिरी करणारा चौथाच फलंदाज ठरला आहे. जाणून घेऊयात रोहितने नक्की काय केलं.
रोहित शर्माने आयपीएलमध्ये 6 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रोहित अशी कामगिरी करणारा एकूण चौथा आणि तिसरा भारतीय ठरला आहे. रोहितला या सामन्याआधी 6 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 14 धावांची गरज होती.रोहितने हैदराबाद विरुद्ध तिसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकला. रोहितच्या यासह आयपीएलमध्ये 6 हजार धावा पूर्ण झाल्या. रोहितने आयपीएलच्या 15 व्या वर्षपूर्तीच्या मुहुर्तावर हा अनोखा विक्रम केला आहे.
रोहितने 232 सामन्यांमधील 227 डावात या 6 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितआधी आयपीएलमध्ये विराट कोहली, शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर या तिघांनीच ही कामगिरी केली आहे. आता रोहितने या तिघांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.
आयपीएलमध्ये 6 हजार धावा करणारे फलंदाज
विराट कोहली – 6 हजार 844 धावा
शिखर धवन – 6 हजार 844 धावा
डेव्हिड वॉर्नर – 6 हजार 109 धावा
रोहित शर्मा – 6 हजार 14 धावा
रोहित शर्मा याचा पराक्रम
रोहित शर्मा याने हैदराबाद विरुद्ध 18 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने 155.56 च्या स्ट्राईक रेटने 28 धावा केल्या. रोहितला अपेक्षित सुरुवात मिळाली होती. मात्र त्याला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. पण रोहितने केलेल्या या रेकॉर्डमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
रोहित शर्मा याचा छोट्या खेळीसह मोठा रेकॉर्ड!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -