आयपीएल आज, 22 एप्रिलला आज गुजरात आणि लखनौ यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.
आज लखनौमधील इकाना स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात गुजरात संघ आणि केएल राहुलच्या नेतृत्त्वात लखनौ संघ आमने-सामने येणार आहेत. लखनौ सुपर जायंट्स संघाने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. गुजरात टायटन्सला मागील सामन्यात त्यांच्या घरच्या मैदानावर संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान रॉयल्सकडून पराभवाला सामोरं जावं लागलं.
लखनौ सुपर जायंट्स राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या दणदणीत विजयानंतर आज मैदानात उतरणार आहे. केएल राहुल आणि निकोलस पूरन या खेळाडूंच्या बॅटने शानदार झलक दाखवली आहे. तर आयपीएलमध्ये यंदा लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची दमदार गोलंदाजी पाहायला मिळत आहे.
गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर होणार आहे. टी 20 साठी ही खेळपट्टी खूपच संतुलित आहे. खेळपट्टी फलंदाजीसोबतच गोलंदाजांसाठीही उपयुक्त आहे. येथे खेळल्या गेलेल्या एकूण सहा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे. अशा वेळी नाणेफेक जिंकणं महत्त्वाचं ठरू शकतं. तसेच, पहिल्यांदा फलंदाजी करताना सरासरी 151 धावा होतात. या खेळपट्टीवर फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात.
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा लखनौ नाइट रायडर्स संभाव्य प्लेईंग 11
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, आवेश खान, युद्धवीर सिंग चरक, रवी बिश्नोई.लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग ‘जिओ सिनेमा’ ॲपवर उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.