कोल्हापुरातील सेंट झेवियर्स मतदान केंद्रावर आमदार सतेज पाटील गटाच्या विरोधी परिवर्तन आघाडीकडून बुथ लावण्यात आला आहे. या बुथवर लावण्यात आलेल्या अंगठी चिन्हावरून काही काळ तणाव निर्माण झाला.कोल्हापुरातील कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (23 एप्रिल) सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला आहे. सकाळपासून दोन्ही गटाकडून अत्यंत चुरस पाहण्यास मिळत आहे. कोल्हापुरातील सेंट झेवियर्स मतदान केंद्रावर सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक तसेच खासदार धनंजय महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदान केंद्राबाहेर आमदार सतेज पाटील गटाच्या विरोधी परिवर्तन आघाडीकडून बुथ लावण्यात आला आहे. या बुथवर लावण्यात आलेल्या अंगठी चिन्हावरुन काही काळ तणाव निर्माण झाला. अंगठी चिन्हावरून सत्ताधारी महाडिक गटाकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे अंगठी चिन्ह काढून टाकण्यात आले.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -