Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरKolhapur: वरात बघायला निघाला, अन् अपघातात जागीच ठार!

Kolhapur: वरात बघायला निघाला, अन् अपघातात जागीच ठार!

आजऱ्यात वरात पाहण्यासाठी जात असताना आजरा पेट्रोल पंपासमोर झालेल्या मोटरसायकलच्या अपघातात विकास महादेव पाटील (वय २० रा. देऊळवाडी ता.भुदरगड) हा युवक जागीच ठार झाला. ही घटना काल, रविवारी (दि.२३)रात्रीच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद अभिषेक संजय पोतणीस (रा. सातेवाडी ता. आजरा ) यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अभिषेक पुतणीस व विकास पाटील हे दोघेही आजऱ्यातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात. रात्री हॉटेलमधील काम संपल्यानंतर ते आपल्याकडील मोटरसायकलने वरात पाहण्यासाठी जात होते. यावेळी समोरून विरुध्द दिशेने आलेल्या मोटरसायकलस्वार जितेंद्र रामचंद्र नवार ( रा.आवंडी वसाहत, ता. आजरा ) याने जोराची धडक दिली. यामध्ये विकास पाटील गाडीवरून रस्त्यावर पडला. त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघातात अभिषेक पोतणीस यांच्या पाठीला व हातालाही दुखापत झाली आहे.

जखमी दोघांना तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच विकासचा मृत्यू झाला. आज सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघाताची व विकास मयत झाल्याची माहिती देऊळवाडीत समजताच नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात प्रचंड गर्दी केली होती. विकासच्या पश्चात आई-वडील, तीन विवाहित बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास पो.हे.काॅ. संतोष गस्ती करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -