कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर शहरातील कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी अत्यंत चुरशीने ९१.१२ टक्के मतदान झाले. सभासदांना मतदानासाठी घेऊन येताना दिलेला राजेशाही थाट तसेच साम, दाम, दंड भेदचा झालेला यथेच्छ वापर यामुळे कौल कुणाला मिळणार ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राजाराम साखर कारखान्याच्या संस्था गटातील एक व अन्य गटातील २० अशा २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. दोन अपक्षांसह एकूण ४४ उमेदवार रिंगणात आहेत.
मतमोजणी आज मंगळवार सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार असून दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी विरोधी गटाचे नेते सतेज पाटील
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि.
मतमोजणी आज मंगळवार दि. २५ रोजी बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात होईल. सकाळी आठ वाजल्यापासून दोन फेरीमध्ये २९ टेबलवर मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिले २९ आणि दुसऱ्या टप्प्यात पुढील ३० ते ५८ या केंद्रांची परिवर्तन पॅनेलचे २९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने या निवडणुकीत चुरस टोकाला गेली आहे. दोन्ही बाजूंकडून वैयक्तिक पातळीवर झालेल्या टीकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, मतदानावेळी किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता सर्वच मतदान केंद्रावर शांततेत पार पडले.
महाडिक गटाच्या ताब्यात सध्या एकमेव कारखाना असल्याने हा निकाल बरेच काही सांगून जाणारा असेल, यात शंका नाही. दोन्ही गटाकडून या निकालातून आगामी सर्व निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल. सर्वाधिक चुरस संस्था गटाच्या मतदानात दिसून आली. याच गटातून सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत. विरोधी आघाडीकडून सचिन पाटील रिंगणात आहेत. दोन्ही गटाकडून या ठिकाणी विजयाचा दावा करण्यात आला आहे. शहर परिसरातील सभासद वगळता साडे सहा जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर मतदानासाठी कमालीचा उत्साह दिसून आला.




