Wednesday, February 5, 2025
Homeनोकरीदहावी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी!

दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी!

दहावी पास तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्या तरुणांना इंडियन नेव्ही मध्ये अर्थातच भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी सोने पे सुहागा राहणार आहे. कारण की, भारतीय नौदलात नुकतीच एक भरती निघाली आहे. भारतीय नौसेनेच्या दक्षिणी कमानच्या मुख्यालयात सिव्हीलियनसाठी ही भरती काढण्यात आली आहे.

या भरतीच्या माध्यमातून स्वयंपाकी अर्थातच कूक या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना देखील नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे. विशेष बाब अशी की, कुक या पदासाठी शैक्षणिक पात्रता केवळ दहावी पास ही राहणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा 

सदर अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या पदासाठी मॅट्रिक उत्तीर्ण अर्थातच दहावी पास तरुण पात्र राहणार आहे. मात्र संबंधित व्यापारातील एक वर्षाचा अनुभव सदर उमेदवाराकडे आवश्यक आहे. म्हणजेच कुक या पदाचा एका वर्षाचा अनुभव असणे अपेक्षित आहे. तसेच या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 56 वर्षांपेक्षा अधिक वयाचा नसावा.

अर्ज कुठे करावा लागणार?

यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज साध्या कागदावर लिहून तसेच अर्जावर रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो लावावा लागणार आहे. या अर्जासोबतच सर्व आवश्यक कागदपत्रे देखील उमेदवाराला जोडायची आहेत. हा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे उमेदवाराला फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (नागरी भर्ती सेलसाठी), मुख्यालय सदर्न नेव्हल कमांड, कोची-622004 या पत्त्यावर पाठवायची आहेत. 

अर्ज करण्याची शेवटची दिनांक?

20 जून 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील अशी माहिती समोर आली आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -