Saturday, February 8, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात पुढील 4 ते 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी!

राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी!

राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस होत असताना आता पुन्हा हवामान खात्याने महत्त्वाचा इशारा दिला आहे.येत्या चार दिवसांसाठी राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे.गुरुवारी संपूर्ण राज्यात अवकाळीची शक्यता आहे.तर शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे.शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.तर रविवारी विदर्भातील जिल्ह्यांत अवकाळी पाऊस कोसळू शकतो.

मुंबई शहराला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पण तरी प्रत्यक्षात मात्र कडाक्याच्या उन्हाने नागरिकांची अक्षरश: होरपळ झाली आहे. याठिकाणी पारा 32 ते 35 अंशावर गेला आहे. पण येथील आर्द्रता तापदायक ठरत आहे.

महाराष्ट्रातील हवामानात होणाऱ्या बदलांची साखळी पुढील काही दिवस अशीच सुरु राहणार असून, राज्यात पुढील 4 ते 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ढगांच्या गडगडाटासह राज्यातील विदर्भ आणि कोकणातील काही भागात पावसाची हजेरी जास्त असेल. विदर्भाला पावसाचा तडाखआ तुलनेनं जास्त बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -