इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून हा सामना होणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सध्या आठव्या क्रमांकावर आहे, तर सनरायझर्स हैदराबाद नवव्या क्रमांकावर आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व इडन मार्कराम करणार आहे तर कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व नितीश राणा करणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला सलग तीन सामन्यांपासून सुरू असलेली पराभवाची मालिका संपवायची आहे, तर हैदराबाद संघाला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे.
लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल. येथे इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकण्याचा पर्याय आहे. हा सामना Jio Cinema अॅपवर विनामूल्य पाहता येईल.