स्वत:ला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळता यावं, यासाठी हार्दिकने चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या प्लेयरला बाहेर बसवलं. हार्दिकने असं करुन, आपल्याच टीमच नुकसान केलयगुजरात टायटन्सची टीम 12 पॉइंट्ससह टॉपवर आहे. गुजरातचा परफॉर्मन्स चांगला आहे. पण हार्दिक पंड्याने 20 लाखाच्या एका प्लेयरला बाहेर बसवून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे. गुजरात टायटन्सने 9 पैकी 6 मॅचेस जिंकल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सने मागच्या सामन्यात गुजरातला 5 रन्सनी हरवलं. गुजरातची टीम पुनरागमन करण्यामध्ये माहीर आहे. मागच्या 4 सामन्यात टीम कॉम्बिनेशनमध्ये काहीतरी गडबड झालीय. ज्याचा टीमला फटका बसू शकतो.मागच्या 4 सामन्यात गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये साई सुदर्शन दिसलेला नाहीय. सुरुवातीच्या 5 सामन्यात साई सुदर्शनने कमालीची बॅटिंग केली. पण मागच्या 4 मॅचसपासून तो बाहेर आहे. सुदर्शनने 5 सामन्यात 176 धावा केल्या. त्याची सरासरी 44 ची आहे. सुदर्शनला बेंचवर बसवून गुजरात टायटन्सने आपलच कॉम्बिनेशन खराब केलय.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -