Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरातील माय लेकासोबत झालं भयानक कृत्य

कोल्हापुरातील माय लेकासोबत झालं भयानक कृत्य

कोल्हापुरातील माय लेकाचा मालमत्तेच्या लोभापोटी अपहरण करून मुलाचा खून करणाऱ्या ५ जणांना चेंबूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुनीर पठाण, रोहित अदमाने, राजू दरवेश, ज्योती वाघमारे आणि प्रणव रामटेके अशी संशयितांची नावे असून ५ एप्रिलपासून माय-लेक बेपत्ता होते. पोलिसांना वृद्धेची महिलेची सुटका करण्यात यश आले असले तरी मुलाचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.


कोल्हापुरातील आर के नगर इथे विशाल वसंत कांबळे आणि रोहिणी वसंत कांबळे राहतात. मूळचे कोल्हापुराचे असलेले रोहिणी कांबळे आणि विशाल कांबळे कोल्हापुरातील मालमत्तेवरून कोर्ट कचेरी सुरू असल्याने दोघे मुंबईत आले होते. दरम्यान, दोघेही एका हॉटेलमध्ये थांबले होते. दोघांचे ५ एप्रिल रोजी चेंबूर याच हॉटेलमधून अपहरण करण्यात आले. तर रोहिणी यांच्या बहिणीने दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार २१ एप्रिलला पोलिसांत नोंदवली.

दरम्यान, तपास सुरू होता आणि अखेरीस २ मे रोजी या बेपत्ता झालेल्या माय-लेकाला शोधण्यात पोलिसांना यश आले. ५ एप्रिलला दोघांचे अपहरण करून संशयीत निलंबित बेस्ट बसचालक मुनीर पठाण (४१, वडाळा), चालक रोहित अदमाने (४०, पवई), राजू दरवेश (४०, मीरा रोड), केअर टेकर ज्योती वाघमारे (३३, मानखुर्द) आणि प्रणव रामटेके (२५, रा. कोल्हापूर) पाच ही जणांनी रोहिणी कांबळे यांना सुरुवातीला राजस्थानात घेऊन गेले आणि डांबून ठेवले. त्यांनतर तेथून पुन्हा गोरेगावमध्ये आणून येथील रॉयल पाम ब्लॉक सेक्टरमध्ये ठेवले. तर मुलगा विशाल याला मालमत्ता खरेदी- विक्रीच्या बैठकीसाठी पनवेलला नेऊन एका व्हिलामध्ये खून करून त्याचा मृतदेह बडोदा-अहमदाबाद महामार्गाच्या कडेला फेकून देण्यात आला.

आर के नगर इथे राहणारे वसंत कांबळे हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी होते. त्यांचे काही महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. तर या गुन्ह्यात कोल्हापुरातून अटक करण्यात आलेला प्रणव रामटेके हा वसंत कांबळे यांच्या मामाचा मुलगा आहे. त्यानेच ही मालमत्ता हडपण्यासाठी हा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून कांबळे माय-लेकाची मालमत्ता मिळविण्यासाठी हा कट रचण्यात आल्याची कबुली पाचही जणांनी दिली आहे. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ देसाई यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -