लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ स्मृती शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रमांतर्गत ‘कलेतून वंदन लोकराजाला ‘ हा उपक्रम रविवारी (दि.७) होत आहे. छत्रपती शाहू मिलच्या प्रांगणात सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत कोल्हापूर आणि परिसरातील १०० अभिजात चित्रशिल्पकार प्रात्यक्षिकांतून लोकराजाला अभिवादन करतील.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कलाकृती साकारत असताना रसिकांना पाहण्यासाठी खुल्या असणार आहेत. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या या उपक्रमास रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, कृतज्ञता पर्व वर्ष प्रारंभी दि. २४ एप्रिल २०२२ रोजी १०० चित्रशिल्पकारांनी प्रात्यक्षिके सादर केली होती.
कोल्हापूर: राजु मिलमध्ये उद्या चित्रशिल्पकार प्रत्यक्षियातून करणार लोकराजाला अभिवादन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -