Wednesday, July 30, 2025
Homeक्रीडाMI vs CSK सामन्यात झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माचं डोकं फिरलं, स्पष्टच म्हणाला...

MI vs CSK सामन्यात झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माचं डोकं फिरलं, स्पष्टच म्हणाला “आम्ही लोकं…”

आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नईने मुंबईला दुसऱ्यांदा पराभवाचं पाणी पाजलं आहे. या पराभवामुळे मुंबईचं प्लेऑफचं स्वप्न एक सामना दूर गेलं आहे. त्यानंतर रोहित शर्मा चांगलाच वैतागला आहे.मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील साखळी फेरीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. कारण विजय आणि एक पराभव प्लेऑफचं गणित बदलू शकतं. त्यामुळे प्रत्येक संघ जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामनाही काहीसा असाच होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबईला 6 गडी आणि 14 चेंडू राखून पराभव केला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पण हा पराभव मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या जिव्हारी लागला आहे.

रोहित शर्माने पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडत म्हणाला की, “आमची फलंदाजी हवी तशी झाली नाही. गोलंदाजांना बचाव करण्यासाठी पुरेशा धावा केल्या नाहीत. आमचा बॅटिंग युनिट म्हणून ऑफ-डे होता. दुर्दैवाने तिलक वर्मा नसल्याने मधल्या फळीत आम्ही कमकुवत ठरलो. आम्ही केवळ 16 धावांत तीन विकेट गमावल्या. पियुष चावला खरोखरच चांगली गोलंदाजी करत आहे. इतर गोलंदाजांनी त्याला साथ देणं गरजेचं आहे. प्रत्येकाने पुढे येऊन योगदान दिले पाहिजे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -