Rohit sharma चालू आयपीएल सीजनमध्ये आता ओपनिंगला येणारच नाही का? रोहित शर्माने सीएसके विरुद्धची मॅच संपल्यानंतर तिसऱ्या नंबरवर बॅटिंगसाठी का आला? त्या बद्दल स्पष्टीकरण दिलं.चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या कालच्या सामन्यात रोहित शर्माने सर्वांनाच धक्का दिला. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा ओपनिंगला येतो. पण काल सीएसके विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा तिसऱ्या नंबरवर बॅटिंगसाठी आला. मुंबई इंडियन्सकडून कॅमरुन ग्रीन आणि इशान किशन ओपनिंगला आले होते. रोहितच्या या धक्कातंत्राने सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं. रोहित शर्मा ओपनिंगला का आला नाही? हाच प्रश्न सर्वांना पडला होता.मुंबई इंडियन्सने असं का केलं असाव? यावरुन विविध तर्क-वितर्क लढवले जात होते. मुंबई इंडियन्सच्या या प्रयोगाचा म्हणा, काही फायदा झाला नाही. कारण 20 ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्स फक्त 139 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्सने 14 चेंडू बाकी राखून आरामात हे लक्ष्य पार केलं.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -