भारत यंदाच्या वनडे वर्ल्डकपचे आयोजन करणार आहे. जेव्हापासून आयसीसीने वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे अनेक जाणकार वर्ल्डकप कोण जिंकणार, वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार कोण आहेत अशी चर्चा करत आहेत. आता वेस्ट इंडीजचा माजी धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलने एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
ख्रिस गेलने भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये सेमी फायनल गाठणारे 4 संघ कोणते याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. याचबरोबर ख्रिस गेलने यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा कोण करणार याबाबत देखील वक्तव्य केले. यंदाचा भारतात होणारा वनडे वर्ल्डकप 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला होईल.भारतीय संघ प्रबळ दावेदारभारतीय संघाने 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारताला गेल्या 10 वर्षात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. मात्र ख्रिस गेलच्या मतानुसार यंदा भारताला चांगली संधी आहे. गेल म्हणाला की, ‘भारत सोडा वेस्ट इंडीजने देखील 2016 पासून आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. मात्र भारताकडे दर्जेदार खेळाडू आहेत. त्यांना मायदेशात खेळण्याचा फायदा होईल.”मात्र भारतात वर्ल्डकप जिंकण्याचा दबाव देखील आहे. कारण भारतीय चाहते मायदेशात भारतच जिंकणार अशी अपेक्षा बाळगून आहेत.’
सेमी फायनलचे हे चार प्रबळ दावेदारख्रिस गेलला कोणते चार संघ वर्ल्डकप सेमीफायनल पर्यंत पोहचतील असे विचारल्यावर गेल म्हणाला की हा खूप अवघड प्रश्न आहे. मात्र मला वाटते की भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ सेमी फायनलमध्ये पोहचतील.विराट कोहलीच किंग ठरणारख्रिस गेलच्या मते विराट कोहली मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत आहे. त्यामुळे भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये त्याचा दबदबा राहील.गेल म्हणाला की, ‘फक्त विराट कोहलीच नाही तर प्रत्येक खेळाडू हा वाईट काळातून जातो. मात्र कठिण वेळ फारकाळ टिकत नाही. मजबूत खेळाडू दीर्घकाळ खेळत राहतात. विराट मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत आहे. या वर्ल्डकपमध्ये विराट आपली लय कामय राखत दबदबा निर्माण करेल.’