Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगअक्कलकोटहून देवदर्शन करून परतणाऱ्या 6 भाविकांवर काळाचा घाला

अक्कलकोटहून देवदर्शन करून परतणाऱ्या 6 भाविकांवर काळाचा घाला

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कर्नाटक येथील भाविक अक्कलकोटला आले होते. तिथं त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर परत कर्नाटकडे जात असताना मोठा अपघात झाला. या अपघातात सहा भाविक जागीच ठार झाले. तर आठ भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली. हा अपघात सिमेंट बल्कर आणि क्रूझरमध्ये झाला. कुणाच्या चुकीमुळे हा अपघात झाला. हे अद्याप समोर आले नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. घटनेनंतर मृतदेहांचा पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले. नातेवाईक आल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया होईल.

6 जणांचा मृत्यू
अक्कलकोटहून देवदर्शन करून कर्नाटककडे जाणाऱ्या 6 भाविकांवर काळाचा घाला घातला. अक्कलकोट येथील शिरवळवाडीजवळ अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. सिमेंट बल्कर आणि क्रूझरमध्ये झालेल्या अपघातात 6 जण जागीच ठार तर 8 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मृतक आळंद तालुक्यातील अणूर तालुक्यातील
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी गावाजवळ भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. अपघातात मृत पावलेले सर्वजण कर्नाटकमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कर्नाटकातील आळंद तालुक्यातील अणूर गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

अपघातानंतर सिमेंट बल्कर आणि क्रूझर हे दोन्ही रस्त्याच्या खाली पडले. या अपघातात क्रूझर गाडीतील भाविकांचा मृत्यू झाला. क्रूझर गाडीने हे भाविक कर्नाटकहून अक्कलकोटला गेले होते. दर्शन केल्यानंतर ते कर्नाटककडे परत जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर बघ्यांनी मोठी गर्दी केली. जखमी वेदनेने विव्हळत होते.

अशी आहेत मृतकांची नावे
संगीता मदन माने (वय ३५) रा. बेडगे ता . उमरगा , सुंदराबाई भारतासिंग राजपूत (वय ५५) रा अन्नुर ता.आळंद, ललीता महादेव बग्गे (वय ५० रा अन्नुर), साईनाथ गोविंद पुजारी (वय १० रा अन्नुर), रोहिणी गोपाळ पुजारी (वय ४० रा अन्नुर ता.आळंद) असे पाच मृतांची नाव आहेत. छाया हणमंत ननवरे (वय ४६ रा इंदापूर जि . पुणे) असे सहाव्या मृताचे नाव आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -