ताजी बातमी ऑनलाईन टीम
फ्रान्सची राजधानी पॅरिस सध्या आंदोलनामुळे धगधगत आहे. पॅरिसमध्ये गेल्या 5 दिवसांपासून आंदोलन सुरु असून, मोठया प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आलेली असतानाही आंदोलक मागे हटण्यास तयार नाही. दिवसेंदिवस आंदोलन पेटत असून, ते शमवण्याचे प्रयत्न सध्या अपयशी ठरताना दिसत आहेत. अल्पवयीन 17 वर्षीय मुलावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर संतप्त झालेल्या नागरिक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 719 जणांना अटक केली आहे.
फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डरमॅनिन यांनी सांगितलं आहे की, मंगळवारी पॅरिसच्या नॅनटेरे उपनगरात 17 वर्षीय नाहेलच्या मृत्यूवरून दंगली उसळल्यापासून कमी हिंसाचार झाल्याचं दिसत आहे.
दरम्यान, आंदोलकांनी पॅसिरच्या दक्षिण शहरातील महापौरांच्या घरात कार घुसवली आहे. महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी आणि एक मूल या हल्ल्यात जखमी झाले आहेत. महापौर व्हिन्सेंट जीनब्रुन यांनी ट्विटरवर लिहिले की, आपलं कुटुंब झोपलेले असताना आंदोलकांनी घराला आग लावण्याआधी त्यांच्या घरात कार घुसवली.
आंदोलन भडकलं, महापौरांचं कुटुंब झोपेत असतानाच घरात घुसवली कार; नंतर लावली आग
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -