Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंगप्रियकरासाठी आईनं पोटच्या मुलाची केली हत्या; मृतदेह शोधताना पोलिसांच्या आले नाकीनऊ

प्रियकरासाठी आईनं पोटच्या मुलाची केली हत्या; मृतदेह शोधताना पोलिसांच्या आले नाकीनऊ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गुजरातमधील सुरत शहरात अडीच वर्षांच्या चिमुरड्याची आई नयना मांडवी हिने आपले मूल बेपत्ता झाल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर नयनाने सलग तीन दिवस मुलाचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. पोलिसांना या प्रकरणात नयनावरच संशय येऊ लागल्याने त्यांनी तिला ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या चौकशीत नयनाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रियकरासाठी नयनाने तिच्याच मुलाची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुलाच्या हत्यनेनंतर नयनाने त्याचा मृतदेह लपवून ठेवला होता. पण ती सतत पोलिसांना चुकीची उत्तरे देत होती. मुलाच्या हत्येआधी दृश्यम चित्रपट पाहिल्याचे खळबळजनक सत्यही नयनाने पोलीस चौकशीत सांगितलं आहे.

सुरतच्या दिंडोली भागातील एका बांधकामाच्या ठिकाणी मजूर असलेल्या नयना मांडवीने आपला अडीच वर्षांचा मुलगा वीर मांडवी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. पोलिसांनी महिला काम करत असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. मात्र सीसीटीव्हीमध्ये वीर कुठेही बाहेर जाताना दिसला नाही. बेपत्ता वीरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाचीही मदत घेतली. श्वानपथकही बांधकामाच्या जागेच्या बाहेर गेले नाही. यानंतर वीर तिथून कुठेच बाहेर गेला नाही हे पोलिसांनी निश्चित केले.

मात्र या सगळ्यात नयना काहीतरी लपवत असल्याचे पोलिसांना कळून चुकलं होतं. म्हणून त्यांनी तिची चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलीस नयनाला वीर कुठे हरवला याबाबत अनेक प्रश्न विचारत होते, मात्र ती कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. चौकशीदरम्यान, नयनाने सांगितले की, तिचा एक प्रियकर झारखंडमध्ये राहतो. त्यानेच वीरचे अपहरण केले असावे. यानंतर पोलिसांनी तिच्या प्रियकराशी संपर्क साधून त्याचे लोकेशनही ट्रेस केले. मात्र गेले कित्येक दिवस तो सुरत काय गुजरातच्या जवळही आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे नयनाचं खोटं बोलत असल्याचे पोलिसांना समजलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -