Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगअजित दादांचा बोलबाला, राष्ट्रवादीची चांदीच चांदी, जवळपास सर्वच मंत्र्यांना मोठी जबाबदारी मिळणार?

अजित दादांचा बोलबाला, राष्ट्रवादीची चांदीच चांदी, जवळपास सर्वच मंत्र्यांना मोठी जबाबदारी मिळणार?


महाराष्ट्राच्या राजकारणातील आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तडफदार नेते अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी होताच त्यांची ‘पॉवर’ काय आहे ते स्पष्ट झालं आहे. अजित पवार यांच्या गटाला पॉवरफुल खाती मिळाली आहेत. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदारांचा विरोध होता. पण नंतर अनेक बैठका पार पडल्यानंतर अजित पवार यांना अर्थ खातं मिळालं. याशिवाय शिंदे गटाकडे असणारं कृषी खातं देखील अजित पवार यांच्या गटाकडे गेलं. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे राज्याचे नवे कृषीमंत्री झाले आहेत. तसचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे असणारं अन्न आणि औषध प्रशासन खातंदेखील अजित पवार यांच्या गटाकडे गेलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मंत्री धर्मरावबाब आत्राम यांना आता अन्न आणि औषध प्रशासन खात्याची जबाबादारी मिळाली आहे. तसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार मदत-पुनर्वसन खातं राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील याांच्याकडे गेलं आहे. सत्तेत तिसरा पक्ष सहभागी झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांना याबाबतचे निर्णय घ्यावे लागले. असं असलं तरी आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

अजित पवार गट पालकमंत्रीपदाच्या शर्यतीतही बाजी मारणार?
राष्ट्रवादी काँग्रसेच्या आतापर्यंत 9 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. तसेच आगामी मंत्रीमंडळ विस्तारात आणखी दोन मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे खातेवाटपात जशी अजित पवार यांनी बाजी मारली, तशीच बाजी आता ते पालकमंत्रीपदातही मारण्याची दाट शक्यता आहे. कारण सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -