ताजी बातमी ऑनलाईन टीम
सध्या सोशल मीडियात एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक तरुणी 100 फूट उंच अशा धबधब्यावरुन उडी घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर अक्षरश: काटा येतो. इतक्या उंचीच्या धबधब्यावरुन उडी घेतलेल्या या तरुणीचे प्राण सुदैवाने वाचले आहेत. पण नेमका प्रकार काय आहे आणि या तरुणीने असं का केलं? जाणून घेऊयात…
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ छत्तीसगड मधील बस्तर जिल्ह्यातील आहे. येथील चित्रकूट धबधब्यावरुन तरुणीने उडी घेतली. ज्यावेळी ही तरुणी धबधब्यावरुन उडी घेण्यासाठी जात होती तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी तिला रोखण्याचा प्रयत्न सुद्धा केला. मात्र, या तरुणीने कुणाचेही ऐकले नाही आणि धबधब्यावरुन थेट पाण्यात उडी घेतली. तेथे उपस्थित असलेल्यांपैकी एका व्यक्तीने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात ही घटना शूट केली. याचाच व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तपास सुरू केला असता अशी माहिती समोर आली की, कौटुंबिक वादातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्यासाठी या तरुणीने धबधब्यावरुन उडी मारली. पण देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय येथे आला.
या तरुणीने 100 फूट उंचीच्या धबधब्यावरुन उडी मारली. त्यानंतर ही तरुणी पाण्यात वाहून जात असताना पुढे काही मच्छिमारांनी तिला पाहिले आणि मग त्यांनी तिला बचावले. तरुणीचे नशीब इतके चांगले की, 100 फूट उंचावरुन उडी घेतल्यानंतरही तिचे प्राण बचावले आहेत. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
100 फूट उंच धबधब्यावरुन तरुणीची उडी, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO VIRAL
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -