आगामी सहा दिवस राज्यात चांगला पाऊस पडण्याचे संकेत असून, कोकणात 25 ते 30 जुलैदरम्यान अतिवृष्टी, तर उर्वरित राज्यात 27 व 28 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यातही राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला असून, सर्वच विभागांतील पावसाची तूट भरून निघेल इतक्या पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने संपूर्ण देशातील पाऊस वाढत असून, राज्यातही जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वाऱ्याचा वेग वाढत असल्याने पावसाचा जोर वाढणार आहे.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वाऱ्याचा वेग वाढत असल्याने पावसाचा जोर वाढणार आहे.
असा आहे अलर्ट..
कोकण : 25 ते 30 जुलै : अतिवृष्टी
मध्य महाराष्ट्र : अतिवृष्टी : 26 व 27 जुलै, मुसळधार 28 ते 30 जुलै मराठवाडा : अतिवृष्टी : 26 व 27 जुलै, मुसळधार : 28 ते 30 जुलै विदर्भ : अतिवृष्टी : 25 ते 28 जुलै, मुसळधार : 29 व 30 जुलै