ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्स नवनवीन पद्धतींचा वापर करत आहेत. यातच एक स्कॅम सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येतंय. यामध्ये लोकांना घरबसल्या यूट्यूब व्हिडिओ लाईक करून, किंवा गुगल रिव्ह्यू लिहून पैसे कमावण्याची ऑफर दिली जाते.देशात सुमारे १५ हजार लोक या स्कॅमला बळी पडले आहेत.
चीनी स्कॅमर्सकडून होत असलेल्या या स्कॅममुळे आतापर्यंत ७१२ कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचं हैदराबाद पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी देशाच्या विविध भागातून ९ जणांना अटक करण्यात आली आहे. या स्कॅमला बळी पडलेल्या व्यक्तींमध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रातील लोकही आहेत हे विशेष.असा होतो स्कॅम
हे स्कॅमर्स लोकांना व्हॉट्सअॅपच्या किंवा कॉलच्या माध्यमातून संपर्क साधतात. यामध्ये त्यांना यूट्यूब व्हिडिओ लाईक करणे, चॅनल सबस्क्राईब करणे किंवा गुगल रिव्ह्यू लिहिणे आणि ५ स्टार रेटिंग देणे अशी सोपी कामं सांगितली जातात. या कामाच्या माध्यमातून लाखो रुपये कमावण्याचं आमिष दिलं जातं.
सुरुवातीला गुंतवणूकीची रक्कम अगदी कमी सांगितली जाते. त्यामुळे, एवढे पैसे गेले तर नुकसान काहीच नाही असा विचार करून कित्येक लोक साईनअप करतात. यानंतर या यूजर्सना टेलिग्राम ग्रुपला अॅड केलं जातं. या ग्रुपच्या माध्यमातून त्या व्यक्तींना टास्क दिले जातात, ज्यामधून हजार-दोन हजार रुपयांचं प्रॉफिट मिळवून दिलं जातं, जेणेकरून त्यांचा विश्वास बसेल.
याच्या पुढच्या टप्प्यात यूजर्सना आणखी पैसे कमावण्याचं आमिष देऊन, अधिक गुंतवणूक करायला लावली जाते. ही रक्कम यूजर्सच्याच वॉलेटला राहणार असल्याचंही सांगितलं जातं. आधी पैसे मिळाले असल्यामुळे यूजर्स या स्कॅमर्सवर विश्वास ठेवतात, आणि सांगितलेली रक्कम गुंतवतात. यानंतर यूजरचं वॉलेट ब्लॉक केलं जातं, आणि स्कॅमर्स यूजरला ब्लॉक करून गायब होतातसरासरी ५-६ लाखांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारची कमीत कमी १५ हजार प्रकरणं समोर आली आहेत. सरासरी एका व्यक्तीची पाच ते सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. एका प्रकरणात तर भरपूर पगार असणाऱ्या एका सॉफ्टवेअर कर्मचाऱ्याला तब्बल ८२ लाखांचा गंडा घातला गेला आहे.
कुठे जातात पैसे?
या स्कॅममधील बहुतांश ट्रान्झॅक्शन हे नेहमीच्या यूपीआय वॉलेट्स ऐवजी विशेष अशा क्रिप्टो-वॉलेटच्या माध्यमातून होत असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये टेरर फायनान्सिंग मॉड्यूल म्हणून कुप्रसिद्ध असणाऱ्या Hezbollah wallet चा समावेश असल्याचंही स्पष्ट झालं आहे. लोकांकडून उकळलेले पैसे हे पुढे दुबईपर्यंत जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या पैशाचा वापर पुढे क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी होतो.नऊ जणांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये हैदराबादमधील चार, मुंबईमधील तीन आणि अहमदाबादमधील दोघांचा समावेश आहे. याप्रकरणी आणखी सहा जण दुबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या सहा जणांचा शोध सुरू आहे.
चीन कनेक्शन
अहमदाबादमधून ज्या दोघांना अटक करण्यात आली, ते चीनी नागरिकांच्या संपर्कात होते असंही स्पष्ट झालं आहे. भारतीय बँक अकाउंट्सची माहिती चीनमधील स्कॅमर्सना पुरवून, ओटीपी शेअर करणे आणि खाती ऑपरेट करणे अशा गोष्टींसाठी हे दोघे मदत करत होते. अटक करण्यात आलेल्या नऊ लोकांपैकी एकाने चीनी स्कॅमर्सना तब्बल ६५ बँक खात्यांची माहिती दिली होती, असं स्पष्ट झालं आहे.
युट्युब व्हिडिओ लाईक करून पैसे कमवा; पंधरा हजार नागरिकांची 700 कोटींना फसवणूक! काय आहे हा स्कॅम
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -