Sunday, December 22, 2024
Homeजरा हटके500 Note : स्टार चिन्हाची 500 रुपयांची नोट आहे का खोटी? केंद्र...

500 Note : स्टार चिन्हाची 500 रुपयांची नोट आहे का खोटी? केंद्र सरकारने दिले हे उत्तर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सोशल मीडियावर गेल्या तीन दिवसांपासून 500 रुपयांच्या नोटेवरुन वादंग उठले आहे. या नोटेमागील शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नसल्याचे चित्र आहे. याविषयीची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये 500 रुपयांची एक नोट दिसत आहे. या नोटेच्या क्रमांकामध्ये एक स्टार चिन्ह (*) अंकित आहे. या पोस्टमध्ये युझरने स्टार चिन्ह (*) अंकित असलेली नोट नकली असल्याचा दावा केला आहे. या पोस्टनुसार, गेल्या काही दिवसांपासून बाजारात ही 500 रुपयांची खोटी नोट फिरत आहे. या नोटेपासून ग्राहकांनी चार हात दूर राहावे, असा इशारा या पोस्टमध्ये देण्यात आला आहे. खास करुन हातगाडी, फेरीवाल्यापासून अशा नोट न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काय खरे आणि काय आहे खोटे?

बँकेला पण ओढले वादात

500 रुपयांच्या नोटेच्या क्रमांकापूर्वी स्टार चिन्ह (*) असेल तर ही नोट खोटी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याने याविषयीचा फोटो पण शेअर केला आहे. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, इंडसइंड बँकेने आजपासून अशा 500 रुपयांच्या नोटा घेण्यास मनाई केल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. हा मॅसेज अधिक लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन पण या पोस्टमध्ये करण्यात आले आहे.

फेरीवाल्यापासून राहा सावध

या व्हायरल पोस्टमध्ये फेरीवाल्यापासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्टार चिन्ह असलेल्या 500 रुपयांच्या नोटा फेरीवाले वाटत आहेत. या नोटा खोट्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. या नोटा घेऊ नका. फेरीवाल्यापासून तर एकदम सावध राहण्याचे आवाहन या पोस्टमध्ये करण्यात आले आहे.

पीआयबीने केला खुलासा

सोशल मीडियावर 500 रुपयांच्या नोटेसंबंधीची पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर केंद्र सरकारने त्याची दखल घेतली. याप्रकरणी पत्र सूचना कार्यालयाने ट्विट केले आहे. ही पोस्ट खोटी आणि भ्रम निर्माण करणारी असल्याचा दावा पीआयबीने केला आहे. नोटेच्या सिरीयल क्रमांकाच्या दरम्यान असलेले स्टार चिन्ह आणि ती नोट वैध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -