ITR चा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे. ऑगस्टमध्ये आयटीआर किंवा इतर पैशांच्या व्यवहारात मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा तुमच्या खिशावर नक्की परिणाम होऊ शकतो.येत्या महिन्यात क्रेडिट कार्ड ते आयटीआर यासंबधीत होणाऱ्या मोठ्या बदलांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
1. क्रेडिट कार्ड नियम
जर तुम्ही अॅक्सिस बॅंकेचे क्रेडिट कार्ड वापरुन Flipkart वरुन खरेदी करत असाल तर, तुम्हाला त्यावर कॅशबॅक किंवा कमी इन्सेन्टिव्ह पॉइंट्स मिळतील. खाजगी क्षेत्रातील बँकेने १२ ऑगस्टपर्यंत ही कपात केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार,१२ ऑगस्ट २०२३ पासून Flipkart वर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला १.५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
2. SBI अमृत कलश
SBI च्या विशेष FD स्कीम अमृत कलशमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट आहे. ही ४०० दिवसांची टर्म डिपॉजिट स्किम आहे. या स्किमचा व्याजदर नियमित ग्राहकांसाठी 7.1 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.6 टक्के असा आहे. या विशेष एफडी स्किम अंतर्गत मुदतपूर्व पैसे काढण्याची आणि कर्जाची सुविधा देखील मिळू शकते.
3. इंडियन बँक IND SUPER 400 दिवसांची विशेष FD
इंडियन बँकेची विशेष FD स्किम आहे. या स्किमचे नाव “IND SUPER 400 DAYS” आहे. या 400 दिवसांच्या मुदत टर्म डिपॉझिट योजनेअंतर्गत १० हजार ते २ कोटी रुपयांची गुंतवणूक करता येईल. यामध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे. ४०० दिवसांच्या विशेष FD अंतर्गत, सामान्य लोकांना 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याज दिले जात आहे.
इंडियन बँकेची ३०० दिवसांची एफडी स्किमदेखील आहे. या स्किम अंतर्गत ५ हजार ते २ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. या स्किममध्ये गुंतवणूक करण्याची वेळ ३१ ऑगस्ट आहे. यामध्ये सर्वसामान्यांना 7.5 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.55 व्याज दिले जाईल.
4. इनकम टॅक्स रिटर्न भरणे
आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. जर तुम्ही ३१ जुलैनंतर आयटीआर अर्ज भरणार असाल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. १ ऑगस्टपासून ५ हजार रुपयांचा दंड लागू होणार आहे. जर तुम्ही अंतिम तारखेपर्यंत आयटीआर भरला नाही तर आयटीआर भरण्यासाठी तुमच्याकडे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतचा वेळ आहे.
३१ जुलैनंतर आयटीआर भरल्यास कायदा 1961 च्या कलम 234 अंतर्गत ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. मात्र, ज्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असेल, त्यांना १००० रुपये जमा करावे लागतील.
5. IDFC बँक FD
IDFC बँकेने ३७५ दिवस आणि ४४४ दिवसांसाठी अमृत महोत्सव टर्म डिपॉझिट स्किम सुरू केली आहे, या स्किममध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी 15 ऑगस्ट आहे. ३७५ दिवसांच्या FD वर कमाल 7.60 टक्के व्याज आहे. तर ४४४ दिवसांच्या FD वर कमाल व्याज 7.75 टक्के आहे.
6. बँका राहतील इतक्या दिवस बंद
आजकाल बॅंकेची अनेक कामे घरबसल्या होतात. परंतु काही कामांसाठी बॅंकेत जाणे महत्त्वाचे असते. जर तुमचे बँकेत काही काम असेल तर रिझर्व्ह बँकेने सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार आहेत.
ऑगस्ट महिन्यात तुमच्या खिशाला बसणार कात्री!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -