Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगऑगस्टमध्ये पडणार ऑफर्सचा पाऊस! अमेझॉन-फ्लिपकार्टचे मोठे सेल; लक्षात ठेवा तारखा

ऑगस्टमध्ये पडणार ऑफर्सचा पाऊस! अमेझॉन-फ्लिपकार्टचे मोठे सेल; लक्षात ठेवा तारखा

ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर सण-उत्सव असतात. सोबतच, भारताचा स्वातंत्र्यदिन देखील याच महिन्यात असतो. याचंच औचित्य साधून कित्येक ई-कॉमर्स कंपन्या आपल्या विविध ऑफर्सची घोषणा करतात. यावर्षीही कित्येक मोठ्या कंपन्या आपले ‘शॉपिंग फेस्टिवल’ घेऊन येणार आहेत.

अमेझॉन
अमेझॉन ही जगातील मोठ्या ई-कॉमर्स वेबसाईटपैकी एक आहे. ऑगस्टमध्ये अमेझॉनच्या सेलची सुरुवात ‘फ्रेंडशिप डे’ने होणार आहे. 3 आणि 4 ऑगस्ट रोजी अमेझॉनचा ‘फ्रेंडशिप सेल’ असणार आहे. यामध्ये जीन्स आणि शर्टवर 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल.

त्यानंतर 5 ते 9 ऑगस्ट दरम्यान अमेझॉनचा ‘ग्रेट फ्रीडम फेस्टिवल’ (Amazon Great Freedom Festival) हा सेल असेल. यामध्ये सर्व प्रकारच्या प्रॉडक्ट्सवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. यासोबतच ठराविक प्रॉडक्ट्सवर अतिरिक्त 10 टक्के ऑफही मिळेल.

राखी-जन्माष्टमी

रक्षाबंधन आणि जन्माष्टमीनिमित्त देखील अमेझॉनचे सेल असणार आहेत. 8 ते 11 ऑगस्ट पर्यंत असणाऱ्या राखी सेलमध्ये राख्या, गिफ्ट कार्ड आणि इतर गोष्टींवर 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. तर, 17 ऑगस्टला असणाऱ्या जन्माष्टमी सेलमध्ये गोड पदार्थांवर 75 टक्के आणि इतर वस्तूंवर 20 टक्के डिस्काउंट मिळेल.

मेगा फॅशन डेज

27 ते 29 ऑगस्ट अमेझॉनचा मेगा फॅशन डेज हा सेल असेल. यामध्ये टॉप फॅशन ब्रँड्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.

फ्लिपकार्ट
6 ते 10 ऑगस्टपर्यंत फ्लिपकार्टचा ‘बिग फ्रीडम डेज’ (Big Freedom Days Sale) सेल असेल. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल. यानंतर 11 ते 15 ऑगस्टपर्यंत फ्लिपकार्टचा ‘ग्रँड फर्निचर सेल’ असेल. यामध्ये बेस्ट फर्निचरवर 75 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल.

पुढे 21 ते 25 ऑगस्ट पर्यंत फ्लिपकार्ट आपला ‘इलेक्ट्रॉनिक्स सेल’ सादर करत आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसवर मोठ्या ऑफर्स मिळतील. 28 आणि 29 ऑगस्ट यादिवशी ‘फ्लिपकार्ट बजेट धमाका सेल’ असेल. यामध्ये कपडे, फुटवेअर आणि अ‍ॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यंतच्या ऑफर्स असतील.

मिंत्रा
स्वातंत्र्यदिनानिमित्त मिंत्रावरही मोठा सेल असणार आहे. 10 ते 15 ऑगस्ट मिंत्राचा हा (Myntra Independence Day Sale) सेल असणार आहे. यामध्ये सर्व प्रॉडक्टवर 80 टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येईल. सोबतच, बँक क्रेडिट/डेबिट कार्ड ऑफर्समधून अतिरिक्त 10 टक्क्यांची सूटही मिळू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -