Sunday, August 3, 2025
Homeराजकीय घडामोडीराष्‍ट्रवादीचा राज्यातला पहिला उमेदवार ठरला! शरद पवार गटाच्या 'या' नेत्यानं केली मोठी...

राष्‍ट्रवादीचा राज्यातला पहिला उमेदवार ठरला! शरद पवार गटाच्या ‘या’ नेत्यानं केली मोठी घोषणा

सत्तेचा पुरेपूर उपभोग घ्यायचा, भ्रष्टाचार करायचा आणि तो लपवण्यासाठी प्रसंगी बापाला बाजूला करून उडी मारायची, अशी प्रवृत्ती फोफावली आहे, असे स्पष्ट मत जिल्‍हाध्यक्ष व्‍ही. बी. पाटील यांनी व्यक्त केले.प्रवृत्तीला विरोध करणे व कोल्हापूरच्या विकासासाठी राजकारणात सक्रिय झालो असल्याचे सांगत आपण ‘कोल्हापूर’मधून लोकसभा निवडणूक (Kolhapur Lok Sabha Election) लढवणार असल्याची घोषणा राष्‍ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्‍हाध्यक्ष व्‍ही.बी.पाटील यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कोल्हापूर दक्षिणची बैठक सोमवारी (ता.३१) घेण्यात आली. या बैठकीत पाटील बोलत होते.

शहराध्यक्ष आर. के. पोवार अध्यक्षस्थानी होते. व्‍ही. बी. पाटील म्‍हणाले, ‘भाजपचे नेते चंद्रकांत पाटील पाच वर्षे मंत्री होते. मात्र त्यांनी कोल्हापूरचा काय विकास केला, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच त्यांना पुण्याला जाऊन विधानसभा निवडणूक लढवावी लागली. आता काही मंडळी त्यांच्यासोबत आहेत.
मात्र कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा असून, तो कधीही भाजपला स्वीकारणार नाही.’ नितीन पाटील म्हणाले, ‘पक्षाध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर रस्त्यावर लढायला आम्ही, मात्र सन्मान दुसऱ्याचाच झाला. आता नव्या दमाने पक्ष बांधणी करण्याची गरज आहे.’ यावेळी पीटर चौधरी, सुनीता कांबरे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी उपमहापौर सुनील मोहिते, सुनील देसाई, प्रणिती कदम, मोतीलाल चव्हाण, पुष्पराज पाटील आदी उपस्थित होते.राबायला आम्‍ही अन्‌…‘राष्ट्रवादीमध्ये आम्‍ही राबराब राबलो. मात्र दुसऱ्यां‍नीच पदे मिळवली. सत्तेची सर्व पदे कागलमध्ये देण्यात आली आणि मला मार्केट कमिटीत पाठवले. पण, दोन महिन्यात घरी आलो. कानात सांगणाऱ्यांचे ऐकल्यानेच पक्षवाढीस मर्यादा असल्याची टीका आर. के. पोवार यांनी केली. तर पूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनी राधानगरी तालुका सोडून कधीही दौरा केला नाही. घरात बसून नियुक्त्या केल्याने पक्षाची वाताहात झाल्याची टीका निरंजन कदम यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -