पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा अनेक शेतकरी लाभ घेत आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होतो. नुकताच या योजनेचा १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.27 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात १४ वा हप्ता जमा झाला आहे. DBT माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. माहितीनुसार, देशातील आठ कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या योजनेत महत्त्वाचा बदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
योजनेत बदल होणार असला तरी शेतकऱ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की, या योजनेत बदल झाला तरी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. नेमका काय आहे हे बदल जाणून घेऊयात. खास शेतकऱ्यांसाठी बन माहिती तुम्हाला य
पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याचबरोबर यावर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा जाहीर होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार पीएम किसान निधी योजनेत मोठा बदल करणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येतात हे सहा हजार रुपये दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. मात्र आता या योजनेतील हप्ता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षिक आठ हजार रुपये जमा होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
मागच्या काही महिन्यांपूर्वी देखील पीएम किसान निधी योजनेचे पैसे वाढणार अशा चर्चा होत्या मात्र पैसे वाढले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील या बदलाकडे पूर्ण लक्ष लागले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना गरीब शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील किंवा सेवानिवृत्त असतील अशा लोकांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. त्याचबरोबर दहा हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना देखील या योजनेचा फायदा मिळत नाही आणि इन्कम टॅक्स जे लोक भरतात त्यांना देखील या योजनेचा फायदा मिळत नाही.
मोठी बातमी पीएम किसान योजनेत होणार हे मोठे बदल ; शेतकऱ्यांना होणार फायदा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -