Wednesday, December 25, 2024
Homeब्रेकिंगटोमॅटो आणखी महागणार, भाव एवढे वाढणार की सध्याचा दर स्वस्त वाटणार

टोमॅटो आणखी महागणार, भाव एवढे वाढणार की सध्याचा दर स्वस्त वाटणार

गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात टोमॅटोचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीयांना स्वयंपाकात टोमॅटोचा वापर करणे अवाक्याबाहेर झाले आहे. मात्र पुढच्या काही काळात तरी टोमॅटोचे भाव कमी होण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही आहे. उलट पुढच्या काही दिवसांमध्ये टोमॅटोचा भाव दोनशे रुपये प्रतिकिलोच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

घाऊक व्यापाऱ्यांना सुमारे २०० रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो खरेदी करावे लागत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारांमध्ये टोमॅटोचे दर अधिकच भडकण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमधील बाजारात टोमॅटोच्या क्रेटची किंमत ही ४१०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एका क्रेटमध्ये सुमारे २५ किलो टोमॅटो असतात. यामध्ये इतर खर्च जोडला तर राजधानी दिल्लीमध्ये टोमॅटोची किंमत ५ हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळेच किरकोळ बाजारामध्ये टोमॅटो अधिकच महागण्याची शक्यता आहे.

टोमॅटोच्या दरांनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सध्याच्या मोसमात टोमॅटोचा दर प्रति २५ किलोमागे १२०० ते १५०० रुपये एवढा असतो. मात्र सध्या रिटेल मार्केटमध्ये टोमॅटो १५० ते १८० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहेत. टोमॅटोच्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, देशाच्या काही भागात मुसळधार पाऊस आणि काही भागांमध्ये कमी पर्जन्स झाल्याने टोमॅटोचं पीक वाया गेलं आहे. त्यामुळे देशात टोमॅटोची  मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळेच जूव महिन्यापासून देशात टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.

२०२१ आणि २०२२ मध्ये टोमॅटोचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना आपलं पिक फेकून द्यावं लागलं होतं. कारण दर एवढे पडले होते की, टोमॅटो बाजारात नेऊन विचायचे म्हटल्यास गाडी भाडंही त्यातून वसूल होणार नव्हतं. त्यामुळेच देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी यावेळी टोमॅटोचं कमी पिक घेतलं आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -