इचलकरंजी, येथील शाहू कॉर्नर परिसरातील मुस्टँच मेन्स वेअर या दुकानाला शॉर्ट शर्किट होऊन लागलेल्या आगीत तब्बल १४ लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे. सदरची घटना १ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली होती. मात्र, याबाबतची माहिती प्रसिध्दी माध्यमला दिली नाही. याबाबत शहरात चर्चेचा विषय आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, येथील शाहू कार्नर लॉज समोरील मुस्टँच मेन्स वेअर नावाचे दुकान आहे. या दुकानाला १ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास शॉटसर्किटने आग लागली.
या आगीत शर्ट, पॅन्ट, जीन्स, टी शर्ट, अंडर गारमेंट, लॅपटॉप, एसी, कपड्यांचे काँटर, रॅक, फर्निचर, इलेक्ट्रीक वायरींग आदी साहित्या जळून खाक झाले. यामध्ये सुमारे १४ लाखाचे नुकसान झाले असल्याची तक्रार सोमनाथ सुनिल घोगले (वय २८, रा. प्रेमकमल रेसिडन्सी, नारायण मळा) यांनी शिवजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.