टोमॅटोच्या किमती वाढतच आहेत. त्यातच आता कांद्याच्या किमती ऑगस्ट अखेरपर्यंत तीन पट वाढण्याची शक्यता आहे. पुरवठा साखळीत टंचाई निर्माण झाल्यामुळे कांद्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.सप्टेंबरपर्यंत किमतीत दोन ते अडीच पट वाढ होण्याची शक्यता आहे. ही किंमत 60 ते 70 रुपये प्रती किलोच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक’वारी देशातील एक किलो कांद्याचा सरासरी भाव 27 रुपये किलो होता. कांद्याचा कमाल भाव 60 रुपये आणि किमान भाव 10 रुपये प्रती किलो होता. सगळ्यात महाग टोमॅटोची किंमत 257 रुपये किलो तर, सर्वांत स्वस्त किंमत 40 रुपये किलोच्या घरात होती. तत्पूर्वी, देशातील tomato-onion टोमॅटोची कमाल किंमत 140 रुपये होती.
ऑक्टोबरमध्ये कमी होतील किमतीकि’सिल मार्केट इंटेलिजन्स अॅण्ड अॅनालिटिक्सच्या अहवालानुसार, ऑक्टोबरपासून खरीप पिकाची आवक सुरू होईल. नंतर कांद्याचा पुरवठा चांगला होईल. परिणामी, किमतीत घट होऊ शकते. मागणी आणि पुरवठा यांच्यातील असंतुलनाचा परिणाम ऑगस्टच्या अखेरीपर्यंत दिसू शकतो. ग्राऊंड लेव्हलवर सप्टेंबरच्या सुरुवातीपासून किमतींमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.
हे दर 60 ते 70 रुपये किलोच्या घरात जाऊ शकतात. दरम्यान,कांद्याच्या किमती 2020 च्या उच्चतम पातळीपेक्षाही खाली राहतील, असा अंदाज आहे. tomato-onion अहवालानुसार, रब्बी पीक वर्गात मोडणार्या कांद्याच्या साठवण आणि विक’ीत दोन महिन्यात घट होऊ शकते. त्यामुळे खुल्या बाजारात रब्बी स्टॉकमध्ये सप्टेंबरच्या तुलनेत ऑगस्टमध्ये घट होईल. त्यामुळे कांद्याच्या विक्री त वाढ होईल. ऑक्टोबरपासून खरीप पिकाची आवक सुरू झाल्याने कांद्याचा पुरवठा नियमित होईल. परिणामी किमतीत घट होईल, असे यात नमूद करण्यात आले आहे