इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने यंदा बुधवार 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या शर्यती होणार आहेत.
प्रतिवर्षी क्रांती दिनानिमित्त इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीन भव्य होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत इचलकरंजीसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बोट क्लब यांचा सहभाग असतो. यंदा बुधवारी (9 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचा शुभारंभ इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे व अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी ना.बा.एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीनिवास बोहरा व पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर शर्यती झाल्यानंतर सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते बक्षिस समारंभ होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 15001/-, 11001/-, 9001/- व 7001/- अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर मध्यवर्ती सहकारी हातमगा विणकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांच्यातर्फे फिरती चांदीची गदा देण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी दिली. शर्यती पाहण्यासाठी शौकिनांनी यावे, असे आवाहन उपाध्यक्ष बाबासो उर्फ नंदू पाटील, सागर मगदूम, अहमद मुजावर यांनी केले आहे.
इचलकरंजीत भव्य होड्यांच्या शर्यती!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -