राधानगरीपावसाचा जोर ओसरल्याने पाणलोट क्षेत्रातून होणारी पाण्याची आवक कमी झाली असून काळम्मावाडी धरणाच्या सांडव्यावरून होणारा पाणी विसर्ग बंद झाला आहे.पाणी पातळी स्थिर राहिल्याने, धरणाचे पाचही वक्राकार दरवाजे नुकतेच बंद करण्यात आले. दरम्यान, काल रात्री धरणस्थळावरील वीज केंद्रातून वीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे. केंद्रातील दोन पैकी एक जनित्र संच कार्यान्वित करण्यात आला आहे.आता पायथ्याच्या वीजगृहातून वीज निर्मितीसाठी सोडलेल्या १००० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काल सायंकाळी धरणात २०.५८ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण ८१ टक्के भरले आहे. धरणाच्या वक्राकार दरवाजातून शुक्रवार (ता. ४) पासून बाराशे क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला होता.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -