Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगराष्ट्रध्वजाचे हे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

राष्ट्रध्वजाचे हे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्य दिवस. या दिवशी दिल्लीमध्ये ध्वजारोहण झाले की प्रत्येकजण आपल्या विभागात, सोसायटीत, आवारात आणि काही लोक अगदी घरातही ध्वजारोहण करतात.

आपण खरं तर कधीही आणि कुठेही वैयक्तिक पातळीवर ध्वजारोहण करू शकतो. मात्र २००२ पूर्वी असे होत नव्हते.

भारतीयांना फक्त तेव्हा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची परवानगी देण्यात आली होती. पण यात २६ जानेवारी २००२ पासून बदल करण्यात आला. देशाचा तेव्हापासून कोणताही नागरिक कोणत्याही दिवशी आपल्या भारत देशाचा राष्ट्रध्वज फडकवू शकतो.

पण तुम्हाला माहित आहे का, राष्ट्रध्वज म्हणजे केवळ तीन रंग नाहीत किंवा एखादे रंगीत कापड नाही. जागतिक पातळीवर त्याला मोठे मानाचे स्थान आहे. तसेच ध्वज हीच आपल्या देशाची ओळख आहे.

आपण त्यामुळे उत्सुकतेने ध्वज फडकवत असतो तरी आपल्याकडून अवमान होता काम नये याची काळजी घ्यावी. यामुळेच राष्ट्रध्वजा संदभार्त काही नियम आहेत. जे प्रत्येकाने काळजीपूर्वक पाळायला हवे.

राष्ट्रध्वज फडकविण्याचे नियम पुढीलप्रमाणे.

राष्ट्रध्वज हा लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा.

झेंडा आयताकार असायला हवा. त्याची लांबी आणि रुंदी ही ३:२ या प्रमाणातच असावी.

झेंड्याचा तिरंगाक्रम म्हणजे सगळ्यात वर केशरी मग पांढरा आणि मग हिरवा असाच पाहिजे चुकूनही हे चुकवू नये. झेंडा फडकवताना चुकूनही केशरी रंग खालील बाजूस येता कामा नये.

सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान आपल्याला तिरंगा फडकविता येतो. सूर्यास्त झाल्यानंतर आठवणीने ध्वज खाली उतरवून ठेवावा.

राष्ट्रध्वज कधीही जमिनीवर ठेवू नका.

कधीही ध्वज पाण्यात बुडवू नये, जर तो चुकून जळाला असेल तर असा ध्वज फडकवू नये, आपल्या राष्ट्रध्वजाबाबत आक्षेपार्ह विधान कधीही करू नये, तसेच अवमानकारक टीका देखील करू नये, असे केल्यास तीन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

राष्ट्रध्वजाचा जर कुणी गैरवापर करत असेल किंवा वस्त्र म्हणून, घरगुती वापरासाठी कपडे म्हणून वापरत असेल, मृतदेहाभोवती तिरंगा लपेटत असेल तर (शहीद जवान वगळून) तो तिरंग्याचा अपमान समजला जातो.

कोणत्याही प्रकारची राष्ट्रध्वजावर अक्षरे लिहू नयेत. किंवा त्यावर कोणती वस्तू देखील ठेवू नये.

झेंडा गाडी, रेल्वे किंवा विमानाचे छत किंवा अन्य भाग झाकण्यासाठी वापरू नये. राष्ट्रध्वजा समान तिरंगी पडदा घरात लावणे देखील गैर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -