ताजी बातमी ऑनलाईन टीम
बिग बॉस ओटीटी 2’ने धमाल केलीये. विशेष म्हणजे या सीजनला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. बिग बॉस ओटीटी 2 ला सलमान खान याने होस्ट केले. अनेकदा सलमान खान हा घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास घेताना देखील दिसला. बिग बॉस ओटीटी 2 मध्ये महेश भट्ट यांची लेक पूजा भट्ट ही सहभागी झाल्याने मोठी चर्चा रंगली. विशेष म्हणजे पूजा भट्ट चांगला गेम खेळताना बिग बाॅसच्या घरात दिसली. विशेष म्हणजे बिग बॉस ओटीटी 2 तब्बल 50 दिवसांपेक्षाही अधिक दिवस काळ चालले आहे. नुकताच आता बिग बॉस ओटीटी 2 चा ग्रँड फिनाले पार पडला आहे.
बिग बॉस ओटीटी 2 ला नुकताच विजेता मिळाला आहे. सलमान खान याने विजेत्याची घोषणा केलीये. विशेष म्हणजे यावेळी लाईव्ह मतदान देखील झाले. एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान दोन स्पर्धेकांमध्ये मोठी चुरस ही बघायला मिळाली. शेवटी बिग बाॅसच्या विजेत्याची माळ एल्विश यादवच्या गळ्यात पडली. एल्विश यादव बिग बाॅस ओटीटीमध्ये जोरदार चर्चेत होता.
बिग बॉस ओटीटी 2 च्या विजेत्याला तब्बल 25 लाख रूपये मिळाले आहेत. फक्त 25 लाखच नाही तर विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे. एल्विश यादव याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सुरूवातीपासून बिग बाॅसच्या विजेतेपदासाठी एल्विश यादव याच्या नावाची जोरदार चर्चा बघायला मिळत होती.
बिग बॉस ओटीटी 2 एल्विश यादव विजेता झाल्यापासून सोशल मीडियावर लोक एल्विश यादवला शुभेच्छा देताना दिसत आहेत. एल्विश यादव याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. विशेष म्हणजे बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये जबरदस्त गेम खेळताना एल्विश यादव दिसला. शेवटी एल्विश यादव हाच विजेता झाला आहे.
अनन्या पांडे आणि आयुष्यान खुराना हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी बिग बाॅस ओटीटीच्या फिनालेमध्ये पोहचले होते. यावेळी घरातील स्पर्धेकांसोबत धमाल करताना अनन्या आणि आयुष्मान दिसले. सलमान खान हा देखील ग्रँड फिनालेमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसला. धमाकेदार डान्स घरातील सदस्यांनी देखील केली आहेत.
एल्विश यादव याने लिहिला मोठा इतिहास, पहिल्यांदाच वाईल्ड कार्ड स्पर्धेक ठरला विजेता
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -