Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंगदिवस संपणार, चंद्रावर रात्र झाल्यावर चांद्रयान 3 मोहिमेचे काय होणार? विक्रम आणि...

दिवस संपणार, चंद्रावर रात्र झाल्यावर चांद्रयान 3 मोहिमेचे काय होणार? विक्रम आणि प्रज्ञान काय करणार?



भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग केले. चंद्रावर एक दिवस हा पृथ्वीच्या 14 दिवसांप्रमाणे असतो. लवकरत चंद्रावर अंधार होणार आहे. चंद्रावर दिवस संपून रात्र झाल्यावर चांद्रयान 3 मोहिमेचे काय होणार? विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काय करणार? याची प्लानिंग झालेली आहे. चंद्रावर रात्र झाली तरी भारताची चांद्रयान 3 मोहिम सुरु राहणार आहे.

14 जुलै 2023 रोजी भारताचे चंद्रायान 3 चंद्राकडे झेपावेल. साधारण 40 दिवसांचा प्रवास करुन 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनीटांनी भारताचे चंद्रायान 3 चंद्रावर सुरक्षितरित्या उतरले. ज्यावेळी चंद्रायान 3 चंद्रावर लँडिंग करत होते. त्यावेळेस चंद्रावर सूर्योदय होत होता. यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर संधोशन करण्यासाठी 14 दिवस मिळाले आहेत.

5 किंवा 6 सप्टेंबरला सूर्य अस्ताला जाईल. चंद्रावर रात्र होईल. चंद्राचा पृष्ठभाग अंधारात गुडूप होईल. अंधारात संधोशन करणे आव्हानात्मक ठरु शकते. तसेच चंद्रावर दिवसा आणि रात्रीचे तापमान वेगळे आहे. यामुळे रात्रीच्या वेळेस चंद्रावर मायनस 100 पेक्षा कमी तापमान असते. यामुळे येथील हवामान कसे असेल हे सांगण देखील कठिण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -