Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाआशिया चषकात भारत आणि पाकिस्तानचा पुन्हा थरार, महामुकाबल्याची तारीख ठरली

आशिया चषकात भारत आणि पाकिस्तानचा पुन्हा थरार, महामुकाबल्याची तारीख ठरली

आशिया चषकातील आज अखेरचा साखळी सामना होणार आहे. आफगाणिस्तान आणि गतविजेत्या श्रीलंकामध्ये आशिया चषकातील अखेरचा साखळी सामना होणार आहे. ग्रुप अ मधील चित्र आता स्पष्ट झाले आहे. अखेरच्या साखळी सामन्यात विजय नोंदवत भारतीय संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आता सामना होणार हे निश्चित झाले आहे. सुपर 4 गटामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. हा सामना रविवारी 10 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबर रोजी झालेला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता दोन्ही संघामध्ये पुन्हा एकदा लढत होणार आहे.

शनिवारी, दोन सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानच्या वेगवान तिकडीसमोर भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडाली होती. भारताची आघाडीची फळी 15 षटकांच्या आत तंबूत परतली होती. एकवेळ भारताची अवस्था 4 बाद 66 अशी दयनीय झाली होती. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल स्वस्तात माघारी परतले होते. भारतीय संघ 150 धावांपर्यंत पोहचणार का ? अशी स्थिती निर्माण झाली होती. पण इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी जिगरबाज खेळी करत भारताचा डाव सावरला होता.

हार्दिक पांड्याने 87 धावांची झुंजार खेळी केली होती. तर इशान किशन याने 82 धावांचे वादळी योगदान दिले होते. हार्दिक पांड्या आणि इशान किशन या जोडीने पाचव्या विकेटला 138 धावांची भागिदारी केली. हार्दिक आणि इशान या जोडीच्या बळावर भारतीय संघाने 266 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर पावसाने खोडा घातल्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याला भारतीय फलंदाज कसे तोंड देणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह या वेगवान तिकडीने पहिल्या सामन्यात भारताचा संपूर्ण संघ तंबूत धाडला होता. आता 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

ग्रुप अ आणि ब मधील आघाडीचे दोन संघ सुपर 4 साठी पात्र होतील. ग्रुप अ मधून भारत आणि पाकिस्तान संघाने सुपर 4 मध्ये पात्र झाले आहेत. आज ग्रुप ब चे चित्र स्पष्ट होणार आहे. सुपर 4 मध्ये प्रत्येक संघ प्रत्येकासोबत एक एक सामना खेळणार आहे. म्हणजे, सुपर 4 मध्ये प्रत्येक संघाचे तीन सामने होणार आहेत. आघाडीच्या दोन संघामध्ये फायनलचा थरार होणार आहे. भारतीय संघाचे सुपर 4 मधील सामन्याची तारीख आता निश्चित झाली आहे. 10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. दुसरा सामना 12 सप्टेंबर रोजी आणि अखेरचा लाममा 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. 12 आणि 15 सप्टेंबर रोजी होणारे सामने ग्रुप ब मधील आघाडीच्या दोन संघाविरोधात असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -