Sunday, September 8, 2024
Homeब्रेकिंगLPG पाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात! 3 ते 5 रुपयांनी घटणार दर; केंद्र...

LPG पाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात! 3 ते 5 रुपयांनी घटणार दर; केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता



केंद्र सरकारनं घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये 200 रुपयांची कपात करत देशवासियांना रक्षाबंधनापूर्वी मोठं गिफ्ट दिलं. आता मोदी सरकार दिवाळीपूर्वी देशातील लोकांना आणखी एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याचं बोलंल जात आहे. एलपीजीच्या किमतीत कपात केल्यानंतर आता महागाईनं पिचलेली जनता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे लवकरच सरकार सर्वसामान्यांना गूड न्यूज देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलनं यासंदर्भात सर्वसामान्यांना दिलासादायक माहिती दिली आहे. Domestic Brokerage Firm JM Financials नं दिलेल्या माहितीनुसार, सरकार दिवाळीच्या आसपास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 3 ते 5 रुपयांनी कमी करण्याची घोषणा करू शकतं. आगामी काळात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार असून नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वसामान्यांना मोठ्या दिलासा दिला जाऊ शकतो, असा दावा देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलनं केला आहे.

उत्पादन शुल्कात कपात होणार
ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, जनतेला दिलासा मिळाला तर, त्यामुळे उत्पादन शुल्क किंवा व्हॅटमध्ये कपात होणार आहे. मात्र, सरकारसाठी हा निर्णय तितकासा सोपा असणार नाही. रशिया आणि सौदी अरेबिया या वर्षाच्या शेवटपर्यंत तेल उत्पादनात कपात करतील. याच कारणामुळे कच्च्या तेलानं 10 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -