Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023 साठी टीम इंडियाच्या ‘या’ दिग्गजाची निवड, आयसीसीची मोठी घोषणा

World Cup 2023 साठी टीम इंडियाच्या ‘या’ दिग्गजाची निवड, आयसीसीची मोठी घोषणा

आयसीसी 13 व्या वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड या 5 संघांची घोषणा करण्यात आली आहे. तर उर्वरित 5 संघांची लवकरच घोषणा होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद हे भारताकडे आहे. वर्ल्ड कपसाठी जय्यत तयारी सुरु आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आहे. वर्ल्ड कपमध्ये एकूण 10 शहरांमध्ये 45 दिवसात एकूण 48 सामने पार पडणार आहेत.वर्ल्ड कपसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात तिकीटविक्री सुरु आहे. एकूण वर्ल्ड कपची वातवरणनिर्मिती होत आहे.

अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ट्विट करत मोठी घोषणा केली आहे. वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आयसीसीने वर्ल्ड कपमधील साखळी फेरीतील सामन्यांसाठी अंपायर्ससह मॅच रेफरींची नावं जाहीर केली आहे. आयसीसी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहेआयसीसीने प्रसिद्ध केलेल्या या यादीत एकूण 20 जणांची नावं आहेत. या 20 जणांमध्ये 16 अंपायर्स आहेत. आयसीसी एलीट पॅनेल आणि एमर्जिंग पॅनेलमधील अंपायर्स आहेत. आयसीसी एलीट पॅनेलमधील 12 आणि एमर्जिंग पॅनेलमधील 4 अंपायर्स आहेत. तर 4 हे मॅच रेफरी म्हणजेच सामनाधिकारी आहेत. यामध्ये टीम इंडियाच्या एका दिग्गजांच नावं आहे. तसेच 16 अंपायर्समध्ये केवळ एकमेव भारतीय आहे.आयसीसी एलीट पॅनेलमधील अंपायर्स
नितिन मेनन (भारत), क्रिस्टोफर गॅफनी (न्यूझीलंड), कुमार धर्मसेना (श्रीलंका), मराईस इरास्मस (दक्षिण अफ्रीका), माइकल गफ (इंग्लंड), पॉल रीफेल (ऑस्ट्रेलिया), रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड), रिचर्ड केटलबोरो (इंग्लंड), रॉडनी टकर (ऑस्ट्रेलिया), जोएल विल्सन (विंडीज), अहसान रजा (पाकिस्तान) आणि एड्रियन होल्डस्टॉक (दक्षिण अफ्रीका).

आयसीसी एमर्जिंग पॅनलमधील पंच
पॉल विल्सन (ऑस्ट्रेलिया), शरफुद्दौला इब्ने शाहिद (बांग्लादेश), एलेक्स व्हार्फ (इंग्लंड) आणि क्रिस ब्राउन (न्यूझीलंड).

तसेच श्रीलंकेचे कुमार धर्मसेना, दक्षिण आफ्रिकेचे मराइस इरास्मस आणि ऑस्ट्रेलियाचे रॉडनी टकर ही तिकडी याआधी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2019 मध्ये ही होती. तर अंपायर अलीम डार हे वर्ल्ड कप 2023 चे भाग नसतील. त्यांनी मार्च 2023 मध्ये एलीट पॅनेलमधून राजीनामा दिला होता.

टीम इंडियाच्या दिग्गजाची निवड
टीम इंडियाचे दिग्गज माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ यांची वर्ल्ड कपसाठी मॅच रेफरी म्हणजेच सामनाधिकारी म्हणून निवड केली गेली आहे. जवागल श्रीनाथ यांच्यासह एकूण 4 जण हे वर्ल्ड कपमध्ये मॅच रेफरी असणार आहेत.

मॅच रेफरी कोण कोण?
जवागल श्रीनाथ, जेफ क्रो, एंडी पायक्रॉफ्ट आणि रिची रिचर्डसन या चौघांच्या खांद्यावर वर्ल्ड कपमधील साखळी सामने नियमांप्रमाणे पार पाडण्याची जबाबदारी असणार आहे. तर त्यानंतर सेमी फायनल आणि फायनलसाठी तेव्हाच अंपायर्स आणि मॅच रेफरींची नावं जाहीर केली जातील, असं आयसीसने नमूद केलंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -