Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगनोव्हेंबर महिन्यात योग्य तिथीवरच वाघनख परत आणणार

नोव्हेंबर महिन्यात योग्य तिथीवरच वाघनख परत आणणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं भारतात परत आणले जाणार आहेत. ही वाघनखं सध्या ब्रिटनच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. हा भारताचा अनमोल ठेवा परत आणण्याची मागणी मागील बऱ्याच दिवसांपासून होत आहे. याबाबत सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

मुनगंटीवार म्हणाले की, तारखेनुसार ज्या दिवशी अफजल खानाचा वध करण्यात आला होता, तिथलं ०.२२ हेक्टर अतिक्रमण आपण हटवलं आहे. आता दुसरा टप्पा वाघनखं लंडनमधून आणण्याचा आहे. त्यानुसार मी १ ऑक्टोबर रोजी जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये योग्य तिथीला वाघनखं परत आणणार असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान नोव्हेंबरमध्ये मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हे वघानख महाराष्ट्रात आणचे आहेत. त्यांनी सांगितलं की, वाघनख तुम्हाला गावोगावी फिरवता येणार नाहीत. हे वाघनख छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवणार असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -