Sunday, December 22, 2024
Homeनोकरीकमी शिक्षण झालंय? BOI मध्ये मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

कमी शिक्षण झालंय? BOI मध्ये मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

कमी शिक्षण असल्याने आपल्याला नोकरी कोण देणार? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. पण आता अशा उमेदवारांनी काही काळजी करु नका. कारण बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर देण्यात आला आहे.

बॅंक ऑफ इंडिया काऊन्सेलर, फॅकल्टी मेंबर. ऑफिस असिस्टंट, वॉचमन ही पदे भरली जाणार आहे. या पदांच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. बॅंक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर आणि सांगली येथील शाखेत समुपदेशकाचे प्रत्येकी एक पद भरले जाणार आहे.
कोल्हापूरच्या शाखेत फॅकल्टी मेंबर आणि ऑफिस असिस्टंचे प्रत्येकी 1 पद भरले जाणार आहे. तसेच सांगली येथील शाखेत ऑफिस असिस्टंट, अटेंडंटचे प्रत्येकी 1 आणि वॉचमनची 2 पदे भरली जाणार आहेत. काऊन्सेलर पदासाठी बॅंकेच्या निवृत्त अधिकाऱ्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.त्याचे वय 62 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर इतर पदांच्या पात्रतेचा तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. http://www.bankofindia.co.in
(टीप : सदर भरतीसाठी उमेदवारानी सोबत जोडलेल्या जाहिरातीचा वापर करून योग्य ती माहिती घेवूनच अर्ज करावेत, या भरती संबधी ताजी बातमी शी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधू नये . उमेदवारांच्या सोयीसाठी येथे हि माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. सविस्तर माहिती घेवूनच स्वत:च्या जबाबदारीवर उमेदवारांनी अर्ज करावेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -