शेअर बाजारात (Share Market) धुमाकूळ घालतात. हे बाजारातील छुपे रुस्तम अचानक येऊन चांगल्या कंपन्यांना धोबीपछाड देतात. त्यांच्यावर विश्वास टाकणाऱ्या गुंतवणूकदारांना असा परतावा देतात की त्यांच्या पोटात आनंद काही मावत नाही. या शेअरने अशीच कमाल केली आहे. अवघ्या 2 रुपयांच्या या शेअरने आता गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला. हा शेअर गगनाला भिडला आहे. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली त्यांचे तर वारे-न्यारे झाले आहे. त्यांना जोरदार परतावा मिळाला आहे. या मल्टिबॅगर शेअरने (Multibagger Share) गुंतवणूकदारांना 33,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा शेअर आहे, ते आज मालामाल झाले आहेत. कोणता आहे हा शेअर?
रेफेक्स इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरने ही कमाल केली आहे. शेअरने 33,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ही रेफ्रिजरंट गॅस तयार करणारी कंपनी आहे. हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टिबॅगर ठरला आहे. या कंपनीचा शेअर अवघ्या 2 रुपयांहून 670 रुपयांवर पोहचला आहे. या कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 923.95 रुपये आहे. तर रेफेक्स इंडस्ट्रीजच्या या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 141.65 रुपये आहे.
एका वर्षांत 363 टक्क्यांची उसळी
रेफेक्स इंडस्ट्रीजचा शेअर एका वर्षांत 363 टक्क्यांनी उसळला. कंपनीचा शेअर 12 सप्टेंबर 2022 रोजी BSE वर 147.25 रुपयांवर होता. एका वर्षानंतर आता 8 सप्टेंबर 2023 रोजी बीएसईवर हा शेअर 678.95 रुपयांवर बंद झाला. 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरने 163 टक्क्यांची घौडदौड केली.
5 वर्षांत 3900 टक्के तेजी
रेफेक्स इंडस्ट्रीजचा शेअर 14 सप्टेंबर 2018 रोजी बीएसईवर 16.81 रुपयांवर होता. 8 सप्टेंबर 2023 रोजी हा शेअर 678.95 रुपयांवर बंद झाला. गेल्या पाच वर्षांत या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला. त्याने 3938 टक्क्यांचा परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले. एका वर्षातील गुंतवणूकही फायदेशीर ठरली.
1 लाखांचे झाले 3 कोटी
Refex Industries चा शेअर 29 ऑगस्ट 2013 रोजी बीएसईवर 2 रुपयांवर होता. हा शेअर 8 सप्टेंबर 2023 रोजी हा शेअर 678.95 रुपयांवर होता. या कालावधीत या शेअरने 33,847 टक्क्यांचा परतावा दिला. 10 वर्षांपूर्वी जर एखाद्या व्यक्तीने या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे मूल्य 3.39 कोटी रुपये असते.