Saturday, July 5, 2025
Homeब्रेकिंगडाळींपाठोपाठ तांदूळही महागला

डाळींपाठोपाठ तांदूळही महागला

भाज्यांचे दर आवाक्यात येत असताना गेल्या काही दिवसांपासून तांदळासह डाळींचेही दर वाढले आहेत. त्यामुळे वरण-भाताची चव चाखताना सर्वसामान्यांना विचार करावा लागत आहे. जगभरातील अनेक देशांना भारतातून तांदळाची निर्यात होते. दोन वर्षांपासून तांदळाचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे मात्र, गतवर्षाणामनांतलाच्या नगन सातत्याने वाढ बघायला मिळत आहे. त्यातही प्रामुख्याने बासमती तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

कर्नाटक, गोंदिया, छत्तीसगड, गडचिरोली, पंजाब, दिल्लीसारख्या राज्यांतून नाशिक मध्ये तांदूळ मागवला जातो. त्यातच गेल्या काही वर्षांपासून पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक येथील शेतकरी पांरपरिक बासमती तांदळाऐवजी ११२१ वर्षांपासून पारंपरिक बासमतीची लागवड कमी होत आहे. याचा परिणाम आवकेवर झाला असून, दर वाढले आहेत. बाजारात नवीन तुरडाळ दाखल होण्यासाठी अजून तीन ते चार महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे बाजारात तूरडाळीचा तुटवडा असल्याने महिन्याभरात तूरडाळही किलोमागे ३० ते ५० रुपयांनी महागली आहे. बाजारात तूरडाळ १६५ ते १७० रुपयांनी विक्री होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -