महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने सोमवारपासून पुन्हा अतिक्रमण विरोधात मोहिम सुरू केली. राजर्षि शाहु महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर अतिक्रमण विरोधी मोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये ३ हातगाड्या आणि २० हून अधिक स्टॅण्ड बोर्ड जप्त करण्यात आले. दरम्यान, सदरची मोहिम सुरूच राहणार असल्याचे अतिक्रमण निमुर्लन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
शहरात सातत्याने अतिक्रमण विरोधी मोहिम राबविली जात असली तरी दिवसेंदिवस रस्त्यावरील अतिक्रमणात वाढ होऊन वाहतुकीला अडथळा होत आहे. याबाबत दाखल तक्रारींची दखल घेऊन महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी मोहिम हाती घेतली. राजर्षि शाहु महाराज पुतळ्यापासून शिवतिर्थ परिसर, कॉ. मलाबादे चौक, शॉपिंग सेंटर, महात्मा गांधी पुतळा या परिसरात राबवलेल्या मोहिमेत ३ खाद्यपदार्थांचे गाडे आणि २० स्टॅण्ड बोर्ड जप्त करण्यात आले. या कारवाईत अतिक्रमण निर्मुलन पथकाचे प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह सुरक्षारक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते. ही मोहिम अशीच सुरु राहणार असून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
अतिक्रमणाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.
इचलकरंजी,महानगरपालिकेचा अतिक्रमणावर पुन्हा हातोडादिवसभरात तीन हातगाडे, वीसहून अधिक स्टॅण्डबोर्ड जप्त
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -