काही दिवसांवरच गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सणासुदीच्या काळात गोड मोदकांवर ताव मारणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रत्येक मिठाईला गोडवा आणणाऱ्या साखरेचा भाव वाढला आहे. साखर सध्या प्रति किलो ३७ हजार ७६० रुपये प्रति टनमध्ये विकली जात आहे. साखरेच्या दरात गेल्या दीड महिन्यांत चार रुपयांची वाढ झाली आहे. (Latest Sugar News)
साखरेचे दर वाढल्याने गृहिणींचं खर्चाचं बजेट कोलमडलं आहे. मिठाई व्यवसायिक देखील साखरेचा भाव वाढल्याने चिंतेत आहेत. ऑक्टोबर २०१७ नंतर पहिल्यांदाच साखरेच्या दरात एवढी मोठी वाढ झाली आहे. आता पुढचे काही दिवस साखरेचे वाढलेले दर कायम राहणार आहेत. पुढील दोन महिन्यांपर्यंत साखरेचे दर कमी होणार नाहीत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
४ रुपयांनी महागली साखर
जून महिन्यापासून साखरेच्या दरात वाढ होण्यास सुरूवात झाली. जूनमध्ये ४२ रुपये प्रति किलो आणि जुलै महिन्यात ४४ रुपये प्रति किलो दराने साखर विकली जात आहे. ऑगस्टमध्येही साखरेचे दर ४४ रुपयांवर स्थिर होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये साखर ४८ रुपयांपर्यंत पोहचली आहे.
ऊस उत्पादनाचा तुटवडा पडल्याने साखरेचे दर वाढत आहेत. साल २०२३ -२४ मध्ये साखर उत्पादनात घट झाल्यास साखरेचे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांवर याचा परिणाम होऊ शकतो. मिठाईचे दर देखील यामुळे वाढणार आहेत.
देशातील साखरेचे दर वाढत राहिल्यास साखरेची निर्यात थांबवली जाऊ शकते. साखरेची निर्यात थांबल्यास काही प्रमाणात दरांमध्ये बदल होऊ शकतो. साखरेची निर्यात बंद केल्यावर भारतातील व्यक्तींना साखर योग्य प्रमाणात मिळेल. परिणामी वाढलेले दरही कमी होतील.