Thursday, July 31, 2025
Homeइचलकरंजीआसरा नगरात दहीहंडी कार्यक्रम उत्साहात : नागरिकांची प्रचंड गर्दी

आसरा नगरात दहीहंडी कार्यक्रम उत्साहात : नागरिकांची प्रचंड गर्दी

आसरानगर परिसरात नुकताच पार पडलेल्या एसटी सरकार ग्रुप व जय भवानी युवक मंडळ यांच्यावतीने गुरुवार 7 सप्टेंबर रोजी शिवकन्या महिला दहीहंडी कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात भागातील सर्व माता भगिनी व लहान मुले, मुलींनी भाग घेतला होता, यामध्ये एकुण 70 स्पर्धक होते. यशोदा व क्रुष्णा जोडी,राधिका चा कँटवाँक मधून कला सादर करणे, क्रुष्णा च्या गाण्यावर ग्रुप डान्स आणि यशोदा मैया यांच्या कडून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. या स्पर्धेतील विजेत्यांना मोठी आकर्षक बक्षीस ही देण्यात आली.

या कार्यक्रमास सौ स्मिता संजय तेलनाडे सौ वर्षाराणी संजय केंगार सौ सुवर्णा कल्याण सुरवसे, शिवकन्या महिला ग्रुप आसरानगरच्या अध्यक्षा सीमा वाघ, सदस्या प्रियंका रायनावर, अर्चना साळुंखे वृषाली शिंगारे, सरला पवार, मनीषा निकम, तृप्ती पुला, राधिका शेलार,रोहिणी कुंभार, लक्ष्मी रायनावर, रेश्मा पवार, गौरी सुरवसे, अश्विनी भोंगे , चित्रा भांगे, संगीता खोत, भारती बोनी यांच्यासह परिसरातील महिला व नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी शिवकन्या महिला ग्रुप असरा नगरच्या अध्यक्षा सीमा वाघ यांनी आभार मानले. आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -