Monday, January 6, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत `झिका`चा दुसरा रुग्ण; आरोग्य यंत्रणा सतर्क

इचलकरंजीत `झिका`चा दुसरा रुग्ण; आरोग्य यंत्रणा सतर्क

शहरात आज झिका बाधीत दुस-या रुग्णाची नोंद झाली. राधाकृष्ण चौक परिसरातील ७८ वर्षीय हा रुग्ण आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पूणे यांच्याकडून रक्त तपासणीचा अहवाल झिका पॉझीटीव्ह आला आहे. यानंतर शासकीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून बाधीत रुग्णाच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. यामध्ये विशेषतः गरोदर महिलांची माहिती घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहेयापूर्वी शहरात अग्रसेन भवन परिसरात झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता.
त्यानंतर झिकाचा संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा गतीने कामाला गाली आहे. आता दुसरा रुग्ण सापडल्यांने शहरात झिकाचा झोका अधिकच वाढला आहे.नविन रुग्णाची कोणताही प्रवासाची इतिहास नाही. पंधरा दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर शहरातील एका मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलमध्ये आठवडाभर उपचार सुरु करण्यात आले. त्यांना घरी सोडण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. लालनगर नागरी आरोग्य केंद्रा अंतर्गत बाधीत रुग्णाचा परिसर येतो. केंद्रामध्ये तातडीने वैद्यकीय अधिका-यांची बैठक झाली. त्यामध्ये संबंधित परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह सर्ह्वे सुरु करण्यात आला आहे.
औषध व धूर फवारणीसह पाणी साठे तपासून त्यामध्ये डास अळी नाशक औषध टाकण्यात येत आहे. हा आजार गरोदर महिलांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्यांची माहिती घेण्यात येत असून त्यांना आवश्यक तो सल्ला दिला जात आहे.संपर्कातील १० जणांचे रक्ताचे नमुनेबाधीत रुग्णांच्या संपर्कातील १० जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. पूणे येथील शासकीय प्रयोगशाळेत हे सर्व रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सद्या या बाधीत रुग्णाच्या घरातील कोणाही आजारी अथवा झिकाची लक्षणे दिसून आलेली नाहीत, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -